दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले नाहीत, त्यामुळे हे नेते मतदानाशिवायच राज्यसभेत पोहोचले. मात्र, बिहार, ओडिशा आणि हरियाणातील 11 जागांवर लढत निश्चित आहे. या राज्यांमध्ये अतिरिक्त उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक घेतली जाईल.
महाराष्ट्र (7)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
रामदास आठवले (आरपीआय-आठवले)
विनोद तावडे (भाजप)
रामराव वडकुते (भाजप)
माया इवनाते (भाजप)
ज्योती वाघमारे (शिवसेना -शिंदे)
पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
तमिळनाडू (6)
तिरुची शिवा (डीएमके)
जे कॉन्स्टंटाईन रविंद्रन (डीएमके)
एम थंबीदुरई (एआयएडीएमके)
अंबुमणी रामदास (पीएमके)
एम क्रिस्टोफर टिळक (काँग्रेस)
एल के सुधीश (डीएमडीके)
पश्चिम बंगाल (5)
राहुल सिन्हा (भाजप)
बाबुल सुप्रियो (टीएमसी)
माजी डीजीपी राजीव कुमार (टीएमसी)
ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी (टीएमसी)
कोएल मलिक (टीएमसी)
आसाम (3)
जोगेन मोहन (भाजप)
तेरोस गोवाला (भाजप)
प्रमोद बोरो (यूपीपीएल)
तेलंगणा (2)
अभिषेक मनु सिंघवी (काँग्रेस)
वेम नरेंद्र रेड्डी (काँग्रेस)
छत्तीसगड (2)
लक्ष्मी वर्मा (भाजप)
फूलो देवी नेताम (काँग्रेस)
हिमाचल प्रदेश (1)
अनुराग शर्मा (काँग्रेस)

