प्रदूषण आणि ट्रॅफिक जामला लगाम म्हणून राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक:सरकारचा गजब फतवा

Date:

मुंबई-वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाशी चर्चा करून आणि स्पष्ट कार्यपद्धती म्हणजेच एसओपी तयार केल्यानंतरच पुढे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा परवाने मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत असून ट्रॅफिक जामची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये रिक्षांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतूक व्यवस्थापन अधिक कठीण झाले आहे. शहरांमधील रस्त्यांची क्षमता आणि वाहनांची वाढती संख्या यामध्ये मोठा तफावत निर्माण झाल्यामुळे काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबवणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.

या निर्णयाबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतररस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019) अंतर्गत राज्य सरकारला वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 67 (3) नुसार राज्य सरकारला प्रवासी आणि मालवाहतुकीसंबंधी परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबवण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून वाहतूक कोंडी कमी करणे, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि शहरांमधील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणे शक्य असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, सध्या राज्यभरात सुमारे 14 लाख ऑटो रिक्षा परवाने वितरित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना रिक्षा परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बांगलादेशी नागरिकांनाही अवैध पद्धतीने परवाने मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून परवाना प्रणाली अधिक पारदर्शक आणि नियंत्रित करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरांमधील स्थानिक परिस्थिती, वाहतुकीच्या गरजा आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. लवकरच स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच एसओपी निश्चित करण्यात येईल. मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर आणि नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच राज्यात पुन्हा ऑटो रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मानवता तीर्थावरील मल्लविद्या: शांती आणि शक्तीचा अपूर्व संगम

मानवतातीर्थ भवन, रामेश्वर रुई येथे आयोजित राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड...

असंघटीत, वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले मुंबई, दि. ९ मार्च...

पिंपरी येथे ‘ग्रंथोत्सव’आयोजन

पुणे, दि. 9: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय...

पोलीस शिपाई चालक भरती कौशल्य चाचणीबाबत सूचना

पुणे, दि. 9 : पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती...