पुणे- बदलत्या राजकारणाच्या प्रवाहात आता महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप , राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी आपापल्या संख्याबळानुसार वारीस्थांनी मान्यता दिलेल्या नावांची शिफारस महापालिका आयुक यांच्याकडे केली आहे .
भाजपने ७ स्वीकृत नगरसेवकांच्या पदासाठी दिलेली नावे अशी … निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे,राजेंद्र काकडे,रवि साळेगावकर,जयप्रकाश पुरोहितआणि उदय लेले
राष्ट्रवादी पक्षाकडून २ स्वीकृत नगरसेवकांची नावे देण्यात आली आहेत . ज्यात माजी महापौर दत्ता धनकवडे आणि राकेश कामठे यांचा समावेश आहे. धनकवडे यांना महापौर पदानंतर देखील स्वीकृत सदस्य होण्याची संधी केवळ अनुभवी सदस्य सभागृहात असावेत यासाठी दिल्याचे सांगण्यात आले.
तर कॉंग्रेस पक्षाकडून इंटकचे सुनील शिंदे यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
भाजपचे नेते महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी भाजपची तर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम आणि शहर अध्यक्ष माजी आमदार सुनील टिंग रे यांनी राष्ट्रवादीची नावे जाहीर केली तर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंदूशेठ कदम यांनी कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचे नाव जाहीर केले .

