तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील व  PI संगीता रोकडे  या महिला अधिकाऱ्यांच्या  कणखर भूमिकेमुळे पूर्वापार वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अखेर खुला

Date:

६ वर्षांच्या प्रदीर्घ वादानंतर, कायदेशीर लढाईनंतर शितोळे वस्तीमधील  शेतकऱ्यांसाठी दिलासा
तहसीलदार कोलते यांनी गुडघाभर चिखलात उतरून केली स्थळपहाणी, तब्ब्ल १ किलोमीटर फिरून सर्व पाहणी

वहिवाटीचा रस्ता खुला करताना महिलांना पुढे करुन महिला पोलिसांना धक्काबुक्की

पुणे:

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊरजवळील मौजे कोलवडी गावातील शितोळे वस्ती येथे गट क्र. १६८ मधील पूर्वापार वहिवाटीचा  ६ वर्षांपासून बेकायदेशीररित्या बंद असलेला रस्ता मामलेदार कोर्टाच्या आदेशानंतर खुला करण्यास लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील व  पोलीस निरीक्षक संगीता रोकडे  या महिला अधिकाऱ्यांच्या  कणखर भूमिकेमुळे पूर्वापार वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अखेर खुला झाला.महिला पोलिसांना चावून,लाथ मारून,धक्काबुक्की, झटापट करून शासकीय कारवाईत अडथळा आणणाऱ्या महिला आणि अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ही कारवाई सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी ५ वाजता संपली.६० एकरातील १५ हून अधिक  शेतकऱ्यांच्या वहिवाटीला एकाच कुटुंबाने बेकायदेशीर अडथळा निर्माण केला होता.

या रस्त्यावरून ऍड.मंगेश ससाणे,अमोल ससाणे,योगेश ससाणे,प्रमोद शितोळे,प्रकाश शितोळे,सतिश बोरकर,राजेंद्र बोरकर,मधुकर हरगुडे,चेतन काळभोर,दत्तात्रय काळभोर,सूर्यकांत शितोळे यांसह अनेक शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी अवलंबून होते.मात्र किरण शितोळे,अमर उर्फ बाबा शितोळे  यांच्या कुटुंबाने लोखंडी गेट लावून रस्ता बंद केला होता,रस्त्यात आंब्याची लागवड करून मे २०२१ मध्ये रस्ता अडवला होता.त्यानंतर प्रमोद शितोळे,ऍड.मंगेश ससाणे,योगेश ससाणे,सतीश बोरकर,चेतन काळभोर यांनी मामलेदार कोर्टात सेक्शन ५ अंतर्गत रस्ता खुला करण्यासाठी दावा दाखल केला,मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ कलम ५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४३ अंतर्गत दाखल दाव्यात तहसिलदार/उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थळपहाणी अहवाल,गुगल नकाशा,पीएमआरडीए  नकाशा,साक्षीदारांच्या ऍफिडेव्हिट यांच्या आधारे रस्ता अस्तित्वात असल्याचे आणि अडथळा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.२०२१-२२ मध्ये रस्ता खुला करण्याचे आदेश पारित झाले, त्यानंतर प्रांताधिकारी यांचेकडे केलेले  रिव्हिजन अर्ज  फेटाळले गेले.

त्यानंतर आजपर्यंत ४ वेळा रस्ता खुला करण्याची अंमलबजावणीची नोटीस निघाली, परंतु काही न काही कारणामुळे अंमलबजावणी झाली नाही, याचा प्रचंड त्रास बाधित शेतकऱयांना ५ वर्ष सोसावा लागला.६ मार्च रोजी २०२६ मध्ये तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी स्वतः गुडघाभर चिखलात उतरून पूर्ण क्षेत्राची पाहणी केली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून समेट घडवण्याचा प्रयत्न केला.मात्र किरण शितोळे आणि त्यांच्या कुटुंबाने कायदा व सुव्यवस्था न मानता, गावातील वरिष्ठ मंडळी, पोलीस पाटील, सरपंच, तहसीलदार यांचे न ऐकता पर्यायी मार्गाचा प्रस्ताव फेटाळले  व आडमुठे धोरण घेतले. नदीकाठचा पर्यायी मार्ग धोकादायक असल्याचे सांगूनही ऐकले नाही. कारवाई सुरु झाल्यावर घरातील महिलांना पुढे केले, रस्त्यावर झोपायला लावले  यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत काही महिलांसह गुन्हे दाखल झाले.हे करताना किरण शितोळे याने  ” कारवाई केली तर गुन्हे दाखल करू, मंत्रालयात जाऊ, मंत्र्यांना  बोलतो, प्रेस मध्ये देतो, झाडे  काढली तर हरित लवादात जाणार.. अशा धमक्या प्रशासकीय कर्मचारी,मंडल अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,तहसीलदार यांना दिल्या.

त्या धमक्याना न जुगारता तहसीलदार तृप्ती कोलते,लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता रोकडे या महिला अधिकाऱ्यांनी कणखर व रोखठोक भूमिका घेत रस्ता खुला करण्याचे काम पोलीस संरक्षणमध्ये चालू ठेवले, कोलवडी गावचे तलाठी स्वामी , मंडल अधिकारी जाधव  यांच्या देखरेखीमध्ये हे काम झाले.रात्री बारानंतर पुन्हा किरण शितोळे याने घरातील महिलांना पुढे करून काम थांबवले, महसूल अधिकारी व पोलिसांन धमक्या दिल्या याचे  सर्व चित्रीकरण पोलिसांनी करुन घेतले, त्यानुसार पहाटे ३ वाजता लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणला म्हणून किरण शितोळे, बाबा शितोळे,यशोदा अमर शितोळे, पूनम किरण शितोळे, मैत्रेयी  अमर शितोळे,रोहिणी शशिकांत घोरपडे यांचेवर मंडल अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला.

सकाळी सर्वाना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी  ताब्यात घेतले व त्यानंतर पुन्हा रस्ता  खुला करण्याचे काम पोलीस बंदोबस्त मध्ये सुरु केले.संध्याकाळी हा  रस्ता खुला झाला. ५ वर्षांपासून बंद असलेला रस्ता आता शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे उपलब्ध होणार आहे. प्रभावित शेतकरी हे तृप्ती कोलते-पाटील यांच्या त्वरित आणि निष्पक्ष कारवाईचे क्षेत्रातून कौतुक करत आहेत.तसेच लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता रोकडे,पोलीस निरीक्षक सुरवसे,पोलीस निरीक्षक दिलीप पालवे,पोलीस निरीक्षक अर्जुन बेलगुडे, पोलीस निरीक्षक वंजारी, स्वप्नील जाधव व सर्व स्टाफ यांनी यासाठी मोलाची भूमिका बजावली.”हा शेतकऱ्यांचा खरा विजय आहे,” असे  शेतकऱ्याने सांगितले.आज रस्ता सुरु करण्याची कारवाई झाली, रस्ता सुरु झाला.. पण त्यानंतर सदर किरण शितोळे व कुटुंबातील व्यक्तींनी  हा रस्ता परत बंद केला नाही पाहिजे असं मत व शंका  शेतकऱ्याच्या मनात आहे, किरण शितोळे हा गुंडगिरी प्रवृत्ती चा दमदाटी करणारा असल्याने शेतकरी साशंक आहेत.

पण गटातील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी अडवणूक केली तर  तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश तृप्ती कोलते यांनी दिलेले आहेत.तसेच पोलीस निरीक्षक रोकडे यांनी संबंधित व्यक्तींना परत अडवणूक केली तर सक्त कारवाई करणार अशी ताकीद  दिलेली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये...

कांदा चालला माॅरिशसला…

महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची माॅरिशसलाही निर्यात-मुंबई- राज्यातील...