पारंपरिक वेशात राजपूत महिलांचा ‘होली मिलन’ उत्सव साजरा

Date:

पुणे : पारंपरिक राजपूत वेशात सजलेल्या महिलांनी होळी मिलन कार्यक्रमात रंग, संस्कृती आणि परंपरेची अनोखी झलक साकारली. गीत-नृत्य, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी रंगोत्सवाचा उत्साहात आनंद साजरा केला.

समस्त राजपूत महिला संघ, पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर जवळील सुरभी मंगल कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष मीनल यज्ञदत्तसिंह हजारे, पदाधिकारी पूनम परदेशी, अंजली परदेशी, पूनम हजारे, सरिता कनोजिया, श्रुती किराड व सहकारी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत, महिलांनी पारंपरिक गीत आणि लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमात विविध खेळ देखील घेण्यात आले.

मीनल हजारे म्हणाल्या, महिलांनी सशक्त बनत असताना आपल्या संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जिजाऊंचा आदर्श घ्यावा आणि समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी झाशीची राणी व राणी पद्मिनी यांच्यासारखे धैर्य दाखवा, असेही त्यांनी सांगितले.

पूनम परदेशी म्हणाल्या, संस्थेच्या वतीने सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवणे आणि राजपूतांचा गौरवशाली इतिहास, परंपरा व शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी ‘सावन मिलन’ कार्यक्रम, तलवारबाजी शिबीर तसेच विविध समाजसुधारकांची व्याख्याने असे विविध उपक्रम  राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू...