पुणे – कोंढव्यातील NIBM रस्त्यावर “ओपल स्पा अॅण्ड सलुन” सुरु करून त्याद्वारे महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या नागालँडमधील महिलेला पकडूनती च्या ताब्यातून वेश्याव्यवसायतुन ०४ मुलींची सुटका पुणे पोलिसांनी केली आहे.
काल ०७/०३/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून “ओपल स्पा अॅण्ड सलुन” सर्वे नं २२/२/बी, एस-३, सनश्री वुडस कर्मशिअल प्रिगायसेस बिल्डींग, एन.आय.बी.एम. कोंढवा पुणे येथे स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. या बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहकाचे साह्याने या बाबतची खात्री करुन “ओपल स्पा अॅण्ड सलुन” येथे अचानक छापा टाकुन महिला आरोपी १) टी झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान वय ३२ धंदा स्पा मॅनेजर रा, लेन नं ०५, फ्रेकीज बिल्डींग, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे मुळ पत्ता २८, थांयंपो, यंपीसरा, भंडारी वोखा, राज्य नागालँड, हिला पकडून तिने तिच्या एका पुरुष सहकाऱ्याच्या मदतीने वेश्याव्यवसायासाठी “ओपल स्पा अॅण्ड सलुन” मध्ये आणलेल्या ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.संबधित पुरुष आरोपी चा पोलीस शोध घेत असून दोन्ही आरोपीं विरुध्द दि.०७/०३/२०२६ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १५९/२०२६ भा.न्या.सं १४३ (१) (३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे.
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, अविनाश कोडे तसेच महिला पोलीस अंमलदार खेडेकर यांनी केली आहे.
नागालँडमधील महिलेकडून “ओपल स्पा अॅण्ड सलुन”च्या नावाने कोंढव्यात वेश्याव्यासाय: ४ मुलींची सुटका
Date:

