जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेतर्फे लाडक्या बहिणींचा सन्मान

Date:

षण्मुखानंद सभागृहात भव्य कार्यक्रम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई.दि.८: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या वतीने आज षण्मुखानंद सभागृहात लाडक्या बहिणींचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. याच षणमुखानंद सभागृहातून मुंबईवर भगवा फडकविण्याचा संकल्प शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता आणि त्याप्रमाणे भगवा फडकविला गेला. अनेक कटकारस्थाने झाली, पण शिंदे साहेबांचे नेतृत्व त्यावर मात करून उरले.”
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “नावाच्या पुढे आईचे नाव लावणे या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने करून दाखवली. आईला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे खरे काम या सरकारने केले आहे. कोणी अडचणीत असेल तर मदतीला धावून जाणारी ही शिवसेना आहे, हे शिंदे साहेबांनी वारंवार सिद्ध केले आहे. पेहलगाम हल्ला, दुबईत अडकलेले नागरिक यांच्या मदतीला शिंदे साहेब स्वतः गेले.”

महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “मुंबई महापालिकेच्या समित्यांवर महिलांची नेमणूक करण्यास शिंदे साहेबांनी प्राधान्य दिले. पहिल्यांदाच बेस्ट समितीवर महिलेला अध्यक्षपदी नेमून ऐतिहासिक निर्णय घेतला. अत्यंत सामान्य घरातील ज्योती वाघमारे या भगिनीला राज्यसभेवर संधी देऊन खासदार बनविले. माझ्यासारख्या मध्यम वर्गातील महिलेला उपसभापती पदाची संधी दिली. अनेकांनी हे पद जावे यासाठी प्रयत्न केले, पण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ते पद शाबूत राहिले. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
“महिलांना यशस्वी होण्यासाठी जसा कुटुंबाचा पाठिंबा असतो, तसाच पाठिंबा राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे यांचा कायम राहिला आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. लाडक्या बहिणींच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या मनातील लाडके मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत,” असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

पुढे त्या म्हणाल्या, “आजचा दिवस संघर्ष करणाऱ्यांचा तसाच इतिहास घडविणाऱ्यांचा आहे. म्हणून सर्व महिलांनी स्वतःच्या विकासासाठी, सक्षमतेसाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजेत.” असे नमूद करून डॉ. गोऱ्हे यांनी सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सोन्याच्या आमिषाने 1.34 कोटींची लुबाडणूक:जोडप्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे-पुण्यात स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ महिलेची १...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला...

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी जाहीर पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान...