सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

Date:

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ८- पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजित दादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात काही माध्यमांनी आणि नागरिकांनी टीका केली होती; मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात अजित दादा एका भाषणात म्हणाले होते, ‘आम्ही अभियंता नाही; मात्र अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हे आमचे काम आहे,’ असे स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठ्या वाढीनंतर आता पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे काही मोठ्या शहरांच्या विकासाची गती मंदावल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे पुणे शहराला ‘डी-कंजेस्ट’ करणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे व परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विद्यापीठासमोरील या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना मान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारा समोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

या उड्डाणपुलाची रचना एकात्मिक स्वरूपाची असून वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औंध व बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, सेनापती बापट रोडशी जोडणी तसेच अंडरपास यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या निमित्ताने अजित दादांची आठवण प्रकर्षाने होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, विद्यापीठा समोरील जुना पूल वाहतुकीच्यादृष्टीने अपुरा ठरत असल्याने तो पाडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोरोनाच्या कठीण काळातही पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आणि त्यामुळे तो विक्रमी वेगाने पूर्ण होऊ शकला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा करून पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच नाशिक फाटा-खेड-राजगुरुनगर या महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाला त्यामुळे गती मिळाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी २१ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे सांगून त्यांनी नमूद केले की, पुणे जिल्ह्यासाठी मेट्रोच्या पुढील टप्प्यांना मंजुरी, रामवाडी–वाघोली मेट्रो, येरवडा–कात्रज भुयारी मार्ग, हिंजवडी–शिवाजीनगर मार्गाचा डीपीआर तसेच विविध मार्गांचे सहापदरीकरण अशा अनेक विकासकामांमुळे पुण्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. पुणे शहराला मुंबई महानगराच्या धर्तीवर ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली असून ती प्रत्येक पुणेकरासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना श्रीमती पवार यांनी शुभेच्छाही दिल्या.

श्री. मोहोळ म्हणाले, पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १ हजार ७६३ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास त्याचा मोठा फायदा होईल.

श्रीमती मिसाळ म्हणाल्या,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच मांडलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात पायाभूत सुविधांवर जोर दिला असून त्यात पुण्यासाठी मोठ्या तरतुदी केल्या जेणे करून पुण्याला ग्रोथ हब करण्यासाठी मदत होईल. पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारकडून ८० हजार कोटी रुपये मिळाले असून त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्याचा चौफेर विकास होणार आहे.

श्रीमती नागपुरे यांनी पुणे महानगराच्या विकासासाठी हा पूल महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

श्री. शिरोळे म्हणाले, पुण्याच्या वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी या पुलाचा खूप मोठा उपयोग होणार असून पुण्याच्या विकासासाठी हा मेट्रो आणि रस्ता वाहतुकीसाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपूल महत्वाचा दुवा ठरणार आहे.

डॉ. म्हसे यांनी प्रास्ताविकात या आत्याधुनिक पुलाच्या अभियांत्रिकी बाबी सांगून हा पूल पुणे महानगराच्या पश्चिम विभागासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी आमदार सुनील टिंगरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, मुख्य अभियंता रियाज पठाण तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या एकात्मिक दुमजली उड्डाणपूला बद्दल

▪️उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) १७६३.५२ मीटर आहे.
▪️प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत ₹२७७ कोटी आहे.

▪️औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

▪️वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे:महापलिकेच्या मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा:निलेश निकम

पुणे- PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे याबाबतचा अहवाल...

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी...