जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्या:अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

Date:

मध्यपूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता
पुणे-इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे मानवतेला धोका निर्माण झाला असून, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अण्णांनी या पत्राद्वारे केली आहे. गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला असून, युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

गेल्या आठवड्यापासून मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. आठवडा उलटूनही हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत उपरोक्त आवाहन केले आहे.

नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी जगातील सध्याच्या परिस्थितीवर सखोल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. विविध देशांमधील संघर्षामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे. युद्धात निष्पाप महिला, मुले आणि कुटुंबांना सोसाव्या लागणाऱ्या यातना अत्यंत वेदनादायक आहेत. भारताची संस्कृती ही अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. आपण नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवला आहे, त्यामुळे या कठीण काळात भारताने शांततेचा संदेश देणे गरजेचे आहे.”
शस्त्रे नव्हे, संवाद हवा

अण्णा हजारे यांनी पत्रात संवादाच्या महत्त्वावर भर दिला आहे. “आज जगाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची नाही, तर एकमेकांवरील विश्वासाची आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, मात्र संवादातूनच कायमस्वरूपी समाधान आणि स्थिरतेचा मार्ग निघू शकतो. भारताने एक जबाबदार आणि मोठी लोकशाही म्हणून जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही माझी नम्र प्रार्थना आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. या संवेदनशील वेळी जर भारत माणुसकी आणि शांततेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला, तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धायरी येथील बेनकरवस्ती रस्त्याचे काम रखडले,अपघात, प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल

पालिकेचा गलथान कारभार पुणे:धायरी येथील सर्वात दाट लोकवस्तीच्या बेनकरवस्ती मुख्य...

पुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पशुसंवर्धन विभागाच्या यशोगाथा सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवा; महिला पशुपालकांच्या...

“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार,मान द्यावा जगाने, तोच माझा श्रृंगार”

लोकपरंपरेतील बाईपण ते आत्मभान देणारं आजचं माणूसपण…!! "बाई म्हणे देवा,...

महिला सक्षमीकरणाचा ‘पुणे पॅटर्न’: परिवर्तनाची सक्षम वाटचाल

महिला दिन विशेष महिला सक्षमीकरण हा केवळ घोषणांचा विषय नाही;...