पुणे, ६ मार्च २०२६ : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी संस्था क्रेडाई पुणे यांच्या वतीने रिअल इस्टेट डेव्हलपर्स
असोसिएशनकडून विकसित करण्यात आलेले जगातील पहिले एआय-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म
‘CREDAIBILITY.AI’ लाँच करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म ६ मार्च रोजी शेरेटन ग्रँड, पुणे येथे आयोजित
क्रेडाई पुणेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. प्रॉपटेक कंपनी रिलाटा यांच्या भागीदारीत विकसित
करण्यात आलेले हे अॅप पुण्यातील घरखरेदीदारांच्या प्रॉपर्टी शोध प्रक्रियेची सुरुवात क्रेडाईच्या
इकोसिस्टीममध्येच व्हावी, यासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे अधिक पारदर्शक आणि डेव्हलपर-
नेतृत्वाखालील डिजिटल प्रॉपर्टी मार्केटप्लेस तयार होण्यास मदत होणार आहे.
सध्या या अॅपवर ४०० हून अधिक प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच ही संख्या ८०० पेक्षा
अधिक प्रकल्पांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरासाठी एक सर्वसमावेशक प्रॉपर्टी
शोध प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. काळानुसार एआय आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत या अॅपमध्ये आणखी
एआय-आधारित सुविधा, बाजारपेठेतील अंतर्दृष्टी (मार्केट इन्साइट्स) आणि घरखरेदीदारांसाठी सहाय्यक
साधने समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
Credaibility.AI पारंपरिक रिअल इस्टेट सर्च इंजिनपेक्षा अधिक विश्वासार्ह का?

- ग्राहकांच्या विद्यमान समस्यांवर प्रभावी तोडगा
अनेक प्रॉपर्टी पोर्टल्सवर आढळणाऱ्या बनावट लिस्टिंग, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदी, स्पॅम कॉल्स आणि
डेटाचा गैरवापर यांसारख्या समस्यांवर या अॅपमुळे नियंत्रण मिळते. तसेच एकाच प्रकल्पाची वेगवेगळ्या
ब्रोकरकडून होणारी पुनरावृत्ती टाळल्यामुळे ग्राहकांची गोंधळाची शक्यता कमी होते. - फक्त पडताळणी केलेल्या डेव्हलपर्सच्या प्रकल्पांची नोंद
या प्लॅटफॉर्मवर केवळ क्रेडाई पुणेच्या पडताळणी झालेल्या सदस्य डेव्हलपर्सचेच प्रकल्प दाखवले जातात.
प्रत्येक प्रकल्पाची अधिकृत आणि एकमेव लिस्टिंग थेट डेव्हलपरकडून प्रकाशित केली जाते. - डेव्हलपरशी थेट संपर्क
या प्लॅटफॉर्ममुळे प्रॉपर्टी शोध प्रक्रियेत मधले अनावश्यक दुवे कमी होतात. त्यामुळे घरखरेदीदारांना थेट
डेव्हलपरकडून अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळते. - एआय-आधारित स्मार्ट सर्च सुविधा
या अॅपमध्ये आपल्या सोप्या भाषेत शोध घेण्याची सुविधा आहे. उदाहरणार्थ, “बाणेरमध्ये मेट्रो जवळ ९०
लाखांखाली २ बीएचके” अशा साध्या वाक्यात शोध घेतल्यास एआय तंत्रज्ञान बजेट, जीवनशैली, लोकेशन
आणि कनेक्टिव्हिटीच्या आधारे योग्य प्रॉपर्टी सुचवते.
- कमी स्पॅम कॉल्स आणि डेटा सुरक्षितता
या प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की अनावश्यक लीड्स आणि अवांछित कॉल्स कमी
होतात. त्यामुळे घरखरेदीदारांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीयता जपणारा संवादाचा पर्याय उपलब्ध
होतो. - डेव्हलपर-आधारित पारदर्शक इकोसिस्टीम
डेव्हलपर्सच्या मालकीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे थर्ड-पार्टी पोर्टल्सवरील अवलंबित्व कमी होते. यामुळे
मार्केटिंगमधील अकार्यक्षमता कमी होऊन प्रॉपर्टी शोध प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास वाढण्यास मदत
होते.
या लॉन्चबाबत बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन म्हणाले, “अलिकडच्या काळात प्रॉपर्टी
पोर्टल्सवर बनावट लिस्टिंग, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदी, स्पॅम कॉल्स आणि डेटाचा गैरवापर या बाबींबाबत
अनेक तक्रारी समोर येत आहेत. घरखरेदीदारांनी ऑनलाईन आपली माहिती दिल्यानंतर त्यांना अनेक
अनावश्यक फोन कॉल्स येतात. तसेच एकाच प्रकल्पाची अनेक दलालांकडून स्वतंत्र नोंद केल्यामुळे गोंधळ आणि
चुकीची माहिती पसरते. दुसरीकडे डेव्हलपर्सनाही अपात्र किंवा बनावट लीड्समुळे विपणन खर्च वाढण्याचा
सामना करावा लागतो, ज्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवर होतो. या सर्व दैनंदिन अडचणींवर उपाय म्हणून
आम्ही ‘CREDAIBILITY.AI’ ची निर्मिती केली आहे.”
तसेच क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष अरविंद जैन म्हणाले, “Credaibility.AI हे केवळ तांत्रिक प्लॅटफॉर्म नाही,
तर प्रॉपर्टी शोध प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता आणण्याच्या क्रेडाई पुणेच्या
वचनबद्धतेचे प्रतीक आहे. डेव्हलपर्सच्या मालकीचे एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा आमचा उद्देश आहे,
ज्यामुळे विश्वसनीयता सुनिश्चित होईल आणि प्रॉपर्टी शोधाशी संबंधित सर्व गरजा एका छताखाली उपलब्ध
होतील. घरखरेदीदारांसाठी एआय-आधारित प्रॉपर्टी सर्च इंजिन विकसित करणारी आम्ही जगातील पहिली
संस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक लोकांना लाभ होईल आणि त्यांची
प्रॉपर्टी शोध प्रक्रिया अधिक सुलभ व सहयोगी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
या उपक्रमाच्या माध्यमातून क्रेडाई पुणे प्रॉपर्टी शोध प्रक्रियेला नव्याने आकार देण्याचा प्रयत्न करत आहे.
पडताळणी केलेल्या डेव्हलपर्सच्या प्रकल्पांची नोंद, घरखरेदीदार आणि डेव्हलपर यांच्यातील थेट संवाद तसेच
एआय-आधारित स्मार्ट सर्च या सुविधांचा पारदर्शक आणि इकोसिस्टीम-आधारित चौकटीत समावेश करून ही
प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
बनावट लिस्टिंग, स्पॅम कॉल्स आणि चुकीची माहिती यांसारख्या दीर्घकाळापासून असलेल्या समस्यांवर तोडगा
काढत हे प्लॅटफॉर्म घरखरेदी प्रक्रियेत अधिक विश्वास, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याचे उद्दिष्ट
ठेवते. तसेच तंत्रज्ञानावर आधारित रिअल इस्टेट सर्चसाठी एक नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न या
उपक्रमातून करण्यात येत आहे.

