फ्रँचायझीचा जागतिक अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्य
एकत्र आल्याने देशभरात संघटित फिटनेस क्षेत्राच्या वाढीला वेग
मुंबई, ४ मार्च २०२६ : भारतातील फिटनेस उद्योग आता वाढीच्या टप्प्यात वेगाने प्रवेश करीत आहे. या पार्श्वभूमीवर जेराई फिटनेस लि. आणि प्लस फिटनेस इंडिया यांनी देशभरात १०० जिम सुरू करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीत प्लस फिटनेस इंडियाचा जागतिक फ्रँचायझी व्यवस्थापनाचा अनुभव आणि जेराई फिटनेसचा तीन दशकांहून अधिक काळाचा वारसा एकत्र येत आहे. त्यामुळे जिम व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी एक मजबूत आणि सहाय्यकारी व्यवस्था तयार होणार आहे. भारत अधिक निरोगी आणि तंदुरुस्त बनवणे ही या दोन्ही संस्थांची समान भूमिका या सहकार्यामागे आहे.
या सहकार्यामुळे फ्रँचायझी आणि जिमची उपकरणे एकत्र देणारी नवी पद्धत सुरू होत आहे, त्यामुळे जिम सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. फ्रँचायझीसाठीचे सहाय्य आणि उपकरणांची खरेदी या दोन्ही गोष्टी एकाच व्यवस्थेत मिळाल्यामुळे नवीन उद्योजकांना वेगवेगळ्या पुरवठादारांशी समन्वय साधण्याची गरज कमी होईल आणि जिम सुरू करण्यातील विलंबही टळेल. तसेच, यामुळे व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईल, ब्रँडची एकसंध ओळख टिकून राहील आणि जिमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकाऊ पद्धतीने वाढू शकेल.
‘जेराई फिटनेस लि.’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश राय म्हणाले, “जिमसाठी लागणारी बहुतांश उपकरणे आम्ही स्वतःच्या कारखान्यात तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ‘जेराई फिटनेस’च्या वाढीत मोठी मदत झाली आहे. देशातच उत्पादन केल्यामुळे दर्जावर चांगले नियंत्रण ठेवता येते, खर्च कमी राहतो, आयातीवरील अवलंबन कमी होते आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमालाही चालना मिळते. आमचा विश्वास असा आहे की फिटनेस उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक गंभीर उद्योजकासाठी फिटनेसच्या पायाभूत सुविधा सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या असाव्यात.”
जेराई फिटनेस लि. आणि प्लस फिटनेस इंडिया यांच्यातील सहकार्यातून जागतिक फ्रँचायझीचा अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्य यांचा संगम घडून आला आहे. यातून दोन्ही संस्थांना फिटनेस क्षेत्रातील विस्ताराच्या लाटेत आघाडीवर राहण्यास मदत होणार आहे. या भागीदारीमुळे देशभरात संघटित जिम व्यवसायाचा विस्तार अधिक वेगाने होईल. तसेच टियर-१, टियर-२ आणि टियर-३ शहरांतील उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, उच्च दर्जाच्या फिटनेस सुविधांपर्यंत अधिक लोकांना पोहोचता येईल आणि देशभरात दीर्घकालीन आरोग्याविषयी जागरूकताही वाढेल.
जेराई फिटनेस लि. ही कंपनी फिटनेससाठीची उपकरणे तयार करणारी अग्रगण्य उत्पादक म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षांच्या अनुभवातून या कंपनीने उत्पादन प्रक्रिया, साठा व्यवस्थापन, वितरण व्यवस्था आणि ग्राहक सेवा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत मजबूत व्यवस्था उभी केली आहे. ही कंपनी स्वयंचलित उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. रोबोटिक वेल्डिंग, पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाईन, तसेच तुर्की आणि जपानी आधुनिक यंत्रसामग्री यांचा वापर करून कंपनी उत्पादन करते.
‘प्लस फिटनेस इंडिया’चे मास्टर फ्रँचायझी सिराज लालानी यांनी सांगितले,“मेट्रो शहरांबरोबरच वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांमध्येही एक सुबक आणि व्यावसायिक पद्धतीने चालणारे जिमचे जाळे उभारणे हा ‘प्लस फिटनेस इंडिया’चा दीर्घकालीन उद्देश आहे. देशभरात १०० जिम सुरू करण्याची ही योजना भारतात वाढत असलेल्या व्यवस्थित आणि दर्जेदार फिटनेस सुविधांच्या मागणीला पूरक आहे.
‘प्लस फिटनेस इंडिया’च्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख फैझ सुपारीवाला म्हणाले, “जेराई फिटनेस’सोबतच्या या भागीदारीमुळे आमची जागतिक दर्जाची फ्रँचायझी व्यवस्था भारतातील विश्वासार्ह उपकरण उत्पादकाशी जोडली गेली आहे. फक्त जिम सुरू करणे हा आमचा उद्देश नाही, तर फ्रँचायझी भागीदारांसाठी नफा मिळवून देणारे आणि दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय उभे करणे हा आहे. त्याचबरोबर देश अधिक निरोगी बनवण्यासही आम्ही हातभार लावत आहोत.”
‘प्लस फिटनेस इंडिया’ही आंतरराष्ट्रीय जिम फ्रँचायझी क्षेत्रातील वेगाने वाढणाऱ्या ब्रँडपैकी एक म्हणून ओळखली जाते. या ब्रँडचे जगभरात ३५०पेक्षा जास्त जिम क्लब आहेत. ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत या देशांत, तसेच आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांमध्ये चालतात. २४ तास प्रवेशाची सुविधा, जागतिक स्तरावर एकसारखी पायाभूत रचना आणि तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थापन प्रणाली यामुळे या ब्रँडला विविध देशांमध्ये सातत्यपूर्ण आणि चांगली कामगिरी साधता आली आहे.
आरोग्याविषयीची वाढती जागरूकता, कॉर्पोरेट वेलनेस कार्यक्रम आणि बदलती जीवनशैली यामुळे येत्या काही वर्षांत भारतामध्ये फिटनेस क्षेत्रातील बाजार मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे. वझीर अॅडव्हायजर्स या संस्थेच्या एका अहवालानुसार, भारतातील फिटनेसच्या उपकरणांचा बाजार २०२४ मध्ये सुमारे २,५०० कोटी रुपयांचा होता. तो २०२९ पर्यंत सुमारे ४,६०० कोटींवर जाण्याची शक्यता असून या काळात दरवर्षी त्यात सुमारे १३ टक्के वाढ अपेक्षित आहे.
जिमचा विस्तार करण्याची ही योजना भारतातील फिटनेस क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. ‘जेराई फिटनेस’ची स्वयंचलित उत्पादन क्षमता आणि प्लस फिटनेस इंडिया या ब्रँडची जागतिक विश्वासार्हता यांचा संगम या सहकार्यामुळे घडत आहे. त्यामुळे जिम सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी एक सर्वंकष, विस्तारक्षम आणि नफ्याचे व्यावसायिक मॉडेल उपलब्ध होणार आहे. आरोग्याविषयी अधिक जागरूक अशा समाजाकडे भारत वाटचाल करीत असताना, देशभरात जागतिक दर्जाच्या फिटनेस सुविधा अधिक सहज, परवडणाऱ्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोप्या करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

