मर्सिडीज-बेंझ भारतात सुरू करणार V-Class चे स्थानिक उत्पादन

Date:

भारतीय ग्राहकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस; AIRMATIC सस्पेन्शन, लक्झरी सीट्स, AMG लाईन एक्स्टेरिअर, व्हेंटिलेटेड सीट्स. V-Class (डीझेल V300d आणि पेट्रोल V300) ची संपूर्ण भारतात एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 1.4 कोटी रु.

“भारतीय बाजारपेठेसाठी एकदम कोरी करकरीत नवीन V-Class सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विशेष ग्राहकांना लक्झरी, प्रशस्त जागा आणि त्यांचा खाजगीपणा जपत उत्कृष्ट अनुभव देत ‘प्रायव्हेट सूट’ ची संकल्पना नव्याने परिभाषित करत आहे. प्रवास करताना ज्या ग्राहकांना लक्झरीच्या जोडीला वैयक्तिक जागा, शांतता आणि खाजगीपणा हवा असतो अशा भारतातील संपन्न ग्राहक आणि ट्रेंड सेटर यांच्यात वाढत असलेल्या प्रवाहाला प्रतिसाद देणारी V-Class आहे. आमच्या ग्राहकांसाठी लक्षणीय मूल्यवृद्धी करत V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा निर्णय आमची भारताबद्दलची बांधिलकी अधिक दृढ करतो.”

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर

·         एकदम नवीन V-Class एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस (WB:3430mm L:5370 mm) कॉन्फिगरेशनसह अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये सादर करण्यात आली आहे

·         V-Class भारतात प्रथमच पेट्रोल इंजिनसह सादर

·         V-Class चे AIRMATIC एअर सस्पेन्शन विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत

·         Dual Powertrain: पेट्रोल (170 kW / 228 bhp + 15 kW mild hybrid) आणि डिझेल (174 kW / 233 bhp) पर्यायांमध्ये 9G-TRONIC ट्रान्समिशनसह उपलब्ध

·         आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित वाहन: सर्वोत्तम 7 स्टँडर्ड एअरबॅग्स (A-to-D पिलर विंडो एअरबॅग्स), क्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक, ॲक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, 360° कॅमेरा आणि अटेंशन असिस्ट सह ड्रायव्हर कॅमेरा

·         प्रीमियम स्टँडर्ड वैशिष्ट्ये: स्टँडर्ड स्वरूपात AMG Line एक्स्टेरिअर, तीनही रांगांमध्ये मसाज आणि व्हेंटिलेशनसह फर्स्ट-क्लास लक्झरी सीट्स, AIRMATIC एअर सस्पेन्शन, मल्टिबीम एलईडी हेडलॅम्प्स, बर्मेस्टर सराउंड साउंड आणि 7 स्टँडर्ड एअरबॅग्ज

·         इंडिया फर्स्ट वैशिष्ट्ये: पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनवर AIRMATIC एअर सस्पेन्शन सादर करणारी भारत ही जगातील पहिली बाजारपेठ आहे. तसेच V-Class या विभागातील व्हेंटिलेटेड थर्ड-रो सीट्स देणारे पहिले वाहन आहे

·         नवीन V-Class बुकिंगसाठी उपलब्ध असून विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांना प्राधान्य वितरण केले जाईल

·         V-Class चे बुकिंग 5 लाख रु. मध्ये करता येईल. त्यायोगे ग्राहक प्रारंभिक किंमत मिळविण्यासाठी पात्र ठरतील

मुंबई: भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी लक्झरी दळणवळण क्षेत्राची नव्याने व्याख्या करत भारतातील सर्वाधिक पसंतीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने आज संपूर्णपणे नवीन V-Class सादर केली. नवीन V-Class मध्ये अतुलनीय जागा, आलिशान आराम आणि अवांत-गार्ड डिझाइन यांचा सुरेख मिलाफ आहे. यामुळे प्रवासादरम्यान लक्झरी आणि खाजगीपणा यांच्या जोडीने ग्राहकांना शांत, संतुलित आणि अभूतपूर्व वातावरणाचा अनुभव मिळतो.

ज्यांना आपल्या वातावरणावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि जे अतुलनीय आरामात प्रवास करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतात खास अशा लोकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस कॉन्फिगरेशन (5,370 मीमी लांबी, 3,430 मीमी व्हीलबेस, 1,928 मीमी रुंदी, 1,880 मीमी उंची) मध्ये उपलब्ध असलेली V-Class डिझाइन केली आहे.

‘वैयक्तिक लक्झरी स्पेस’ या वाढत्या प्रवाहाला प्रतिसाद देत V-Class लक्झरी गतिशीलतेची एक नवीन श्रेणी सादर करते: वैशिष्ट्यपूर्णता आणि सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती, ट्रेंडसेटर्स आणि संपन्न भारतीय कुटुंबांसाठी वैयक्तिक जागा, स्वातंत्र्य आणि आलिशान आरामाचा संगम.

V-Class सह मर्सिडीज-बेंझ चोखंदळ ग्राहकांना एक ‘प्रायव्हेट सूट’ सादर करतात. प्रत्येक प्रवासाला अत्यंत वैयक्तिक अनुभवामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेली ही गाडी असून त्यायोगे चाकांवरील, फिरती अशी एक क्युरेटेड जागा निर्माण होते. V-Class खऱ्या अर्थाने प्रवासातील प्रायव्हेट सूट बनते — अत्यंत आधुनिक, प्रशस्त आणि ग्राहकांच्या वैयक्तिक पसंतीनुसार आकाराला आलेली. वाढत्या प्रमाणात भारतीय कुटुंबे कुटुंबासह, पाळीव प्राण्यांसह प्रवासासाठी लक्झरी खाजगी वाहने पसंत करत आहेत आणि अशा कुटुंबांना आपल्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी V-Class परिपूर्ण आहे. ज्यांच्यासाठी लक्झरी, स्वातंत्र्य आणि खाजगीपणा जपत प्रवास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा कुटुंबांसाठी V-Class हे महत्वाचे वाहन असेल.

अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये दुसऱ्या रांगेत 3-स्टेज व्हेंटिलेशन आणि मसाज, काल्फ सपोर्ट, डिप्लोयेबल कपहोल्डर्स आणि वायरलेस चार्जिंगसह फर्स्ट-क्लास स्वतंत्र लक्झरी सीट्स देण्यात आल्या आहेत. तिसरी रांग या सेगमेंटमधील व्हेंटिलेटेड सीट्स देणारे पहिले वाहन म्हणून नवीन मापदंड निर्माण करते; त्यासोबत 3-पॉइंट सीट बेल्ट्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकरज आणि USB चार्जिंग पोर्ट्स देण्यात आले आहेत. एक आलिशान कमांड सेंटर निर्माण करत पुढील रांगेत इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स, कुशन लांबी अॅडजस्टमेंट आहेत.

केबिन वातावरण 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, डॉल्बी अ‍ॅटमॉससह Burmester® सराउंड साउंड सिस्टम,  (15 लाउडस्पीकर्स, 640 W आउटपुट), THERMOTRONIC ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनब्लाइंडसह हीट-इन्सुलेटिंग ग्लास आणि निसर्गध्वनींसह दहा सुसंवादी मधुर वेलनेस मोड्स असलेल्या ENERGIZING Comfort प्रोग्रामद्वारे अधिक उंचावले गेले आहे. दोन्ही बाजूंवरील इलेक्ट्रिक स्लायडिंग दरवाजे किल्ली, बाह्य दरवाजा हँडल, ड्रायव्हर सीट किंवा दरवाजावरील बटणाद्वारे ऑपरेट करता येतात, तर इलेक्ट्रिकली ऑपरेबल स्प्लिट टेलगेटमुळे अरुंद जागेतही सहजपणे लोडिंग करता येते.

स्थानिक उत्पादन: ‘मेक इन इंडिया’ बांधिलकी अधिक दृढ

मर्सिडीज-बेंझ इंडिया V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करणार आहे. हा धोरणात्मक निर्णय भारतीय बाजारपेठेबाबत कंपनीची तीन दशकांची बांधिलकी अधिक मजबूत करतो. मर्सिडीज-बेंझने अतिआलिशान मर्सिडीज-मेबॅक GLS SUV च्या स्थानिक उत्पादनाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. या वर्षी स्थानिक उत्पादनासाठी जाहीर केलेले V-Class हे मर्सिडीज-बेंझचे दुसरे उत्पादन असेल.

परिशिष्ट:
उत्पादन तपशील: मर्सिडीज-बेंझ V-Class

वैशिष्ट्यपेट्रोलडिझेल
Displacement1999 cc1951 cc
Max Rated Power170 kW (228 bhp) + 15 kW (20 bhp)174 kW (233 bhp)
Transmission9G-TRONIC9G-TRONIC

·         सस्पेन्शन: AIRMATIC एअर सस्पेन्शन (दोन्ही पॉवरट्रेनवर सादर होणारी भारत ही पहिली बाजारपेठ) प्रत्येक भूभागावर वाढलेला ड्रायव्हिंग कम्फर्ट, उच्च वेगावर सुधारित इंधन वापर आणि निवडक ड्राइव्ह प्रोग्राम्ससह स्वयंचलितरित्या नियंत्रित डॅम्पिंग

·         सिटींग: फर्स्ट-क्लास लक्झरी स्वतंत्र सीट्ससह 6-सीट लेआउट (रो 2 : 3-स्टेज व्हेंटिलेशन, मसाज, काल्फ सपोर्ट, वायरलेस चार्जिंग; रो 3: व्हेंटिलेटेड – सेगमेंटमध्ये प्रथम; रो 1: इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड)

·         डिझाईन: AMG लाईन एक्स्टेरिअर आणि इंटेरिअर स्टार-पॅटर्न रेडिएटर ग्रिल, LED लाइट स्ट्रिप, AMG व्हेंटिलेशन ग्रिल्स आणि लोगो प्रोजेक्टर

·         इन्फोटेनमेंट: टच डिस्प्लेसह MBUX

·         लायटिंग: हायबीम असिस्ट प्लससह मल्टिबीम एलईडी – प्रत्येक मॉड्यूलमध्ये 84 स्वतंत्रपणे नियंत्रित होणारे उच्च-कार्यक्षमता एलईडीज, वाहतुकीच्या परिस्थितीनुसार अनुकूलित

·         व्हिल्स: 18 इंच AMG अलॉय व्हील्स

·         रंग: 5 एक्स्टेरिअर रंग- मेटॅलिक सोडालाइट ब्लू,  मेटॅलिक रॉक क्रिस्टल व्हाइट, मेटॅलिक ऑब्सिडियन ब्लॅक, मेटॅलिक हाय-टेक सिल्व्हर, अल्पाईन ग्रे

·         अपहोल्स्ट्री (आसनांचे कापडी किंवा लेदर आच्छादन)2 पर्याय – लुगानो लेदर बेज, लुगानो लेदर ब्लॅक

·         ऑडिओ: डॉल्बी अ‍ॅटमॉससह Burmester® सराउंड साउंड सिस्टम, 15 लाउडस्पीकर्स आणि बास रिफ्लेक्स बॉक्ससह, 640 W आउटपुट

·         अॅम्बियंट लाइटिंग: 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग

  • Safety: 7 standard airbags (including window airbags extending from A to D pillar), driver camera with ATTENTION ASSIST

·         सोयीसुविधा:  इलेक्ट्रिक स्लायडिंग दरवाजे (दोन्ही बाजूंनी), इलेक्ट्रिकली ऑपरेबल स्प्लिट टेलगेट, 10 वेलनेस प्रोग्राम्ससह ENERGIZING Comfort

·         सुरक्षितता: 7 स्टँडर्ड एअरबॅग्ज (A ते D पिलरपर्यंत विस्तारणाऱ्या विंडो एअरबॅग्ससह), अटेंशन असिस्टसह ड्रायव्हर कॅमेरा

·         ड्रायव्हर असिस्टन्स: ॲक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक, ॲक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, रिअर क्रॉस ट्रफिक अलर्ट सह ब्लाइंड स्पॉट असिस्ट, अटेंशन असिस्ट

·         पार्किंग: 360° कॅमेरा यांसह पार्किंग पॅकेज, 12 अल्ट्रासॉनिक सेन्सर्स, ॲक्टिव्ह पार्किंग असिस्ट आणि 3D सराउंड व्ह्यूसह पार्किंग पॅकेज

·         आराम: सनब्लाइंडसह हीट-इन्सुलेटेड ग्लास, मागील सीट रांगांसाठी 12 V पॉवर आउटलेट्स, वायरलेस चार्जिंग

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी

मुंबई- राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील विनोद तावडे, रामदास आठवले,...

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

पुणे, दि.४: मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या...

रशियन सैन्य उघडपणे इराणला पाठिंबा देणार..जगाने श्वास रोखला ….

या एका ट्वीट ने जगाचा श्वास रोखला आहे...

‘किराना परंपरा’ : गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या सांगीतिक योगदानावर रविवारी कार्यक्रम

पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘किराना...