45 वर्षापुढील मानसिक दिव्यांगांसाठी दीर्घकालीन योजना आखण्याची गरज – महापौर मंजुषा नागपुरे.

Date:

ईशभक्ती आणि मनःशांती साठी समाजकार्य हा सर्वोत्तम पर्याय – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे सेवासदन दिलासा कार्यशाळेस विविध उपयोगी वस्तू भेट.

पुणे-सेवासदन संस्थेची दिलासा कार्यशाळा ही 18 ते 45 वयोगटातील प्रौढ मानसिक दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू व खाद्य पदार्थांच्या विक्रीतून त्यांना स्वावलंबी बनविते हे कौतुकास्पद असल्याचे मत महापौर मंजुषा नागपूरे यांनी व्यक्त केले. मात्र 45 वर्षापुढील मानसिक दिव्यांगांसाठी काय करता येईल याबाबत योजना आखण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यासाठी “विशेष व्यक्तींसाठी” कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या मदतीने, सी एस आर किंवा मनपा तर्फे काय करता येईल याबाबत मी पुढाकार घेईन असेही महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या.

राजकारणाची पातळी कितीही घसरली तरी आपण आपले कामं करत रहायचे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून संदीप आणि मंजुश्री खर्डेकर दाम्पत्य करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार मा. महापौर मंजुषा नागपुरे यांनी काढले. तसेच पेंशन ही हजार दोन हजार रुपये असते ती दिव्यांगांसाठी तुटपुंजी ठरेल म्हणून दीर्घाकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करूयात असेही त्या म्हणाल्या.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने सेवासदन च्या दिलासा कार्यशाळेस विविध उपयोगी साहित्याची मदत त्यांच्या हस्ते देण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,नगरसेवक पुनीत जोशी,प्रशांत हरसूले,ऍड. प्राचीताई बगाटे,सेवासदन संस्थेचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, सहसचिव अर्चना शहाणे, 

व्यवस्थापिका सौ. मेघनाताई जोशी,सीमाताई दाबके,प्रभागाचे सरचिटणीस वैभव जमदाडे,युवा मोर्चा अध्यक्ष योगेश कर्पे, केतकी कुलकर्णी, संगीता शेवडे, रुपाली मगर, समीर ताडे,रुक्मिणी ताम्हाणे, जयश्री घाटे, बापू गोहाड,भाजपा चे प्रभाग 29 चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना संदीप खर्डेकर यांनी सांगितलं की सध्या राजकारणाची पातळी घसरत चालली असून राजकारणासाठी मुद्द्यांवर विरोध न राहता तो आता वैयक्तिक विरोधाच्या पातळीवर पोहचला असून एकमेकांना बदनाम करणे, वैयक्तिक उणी दुणी काढणे सुरु आहे.

अश्या वातावरणात ईशभक्ती आणि मनःशांती साठी समाजकार्य हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी नमूद केले.

पुनीत जोशी यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित असलेल्या अंत्योदय प्रमाणेच क्रिएटिव्ह फाउंडेशन व भाजपा कार्यकर्ते कार्यरत आहेत असे नमूद केले.

सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या कार्याची माहिती देताना ” आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतो”  हे सांगतानाच समर्थ पथावरील शक्ती 98 चौकात मनपा च्या सहकार्याने कायम स्वरूपी दिव्यांगांनी बनविलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र मी उभारले असल्याचे सांगितले.

भाजपा च्या प्रभाग 29 च्या अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह महापौरांचा सत्कार केला तर ह्या वेळी संस्थेच्या वतीने चिंतामणी पटवर्धन, अर्चना शहाणे व मेघना जोशी यांनी महापौरांचा सत्कार केला.

आजच्या कार्यक्रमात सेवासदन दिलासा कार्यशाळेस सतरंज्या, प्रेशर कुकर, कढया, डबे, मास्क, ग्लोव्हज व इतर वस्तू भेट देण्यात आल्या व पुढील आर्थिक वर्षात अधिक मदत करू असे संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले. मनपा ने ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रम, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, हास्यक्लब अश्यांना वस्तू रुपी मदतीसाठी तरतूद करावी ह्या मागणीचा ही खर्डेकर यांनी पुनरूच्चार केला.

महापौरांनी मुलांमध्ये मिसळून भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अश्या घोषणा दिल्या त्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रीलंकेजवळ इराणी जहाजावर पाणबुडीद्वारे हल्ला:श्रीलंकन नौदलाने 32 जखमींना वाचवले, अनेकजण बेपत्ता

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने इराणमधील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या...

मोदींची 8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...