एस. बी.पाटील पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Date:

पिंपरी, पुणे (दि. २७ जानेवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे डेव्हिड प्रकाश आणि मीना डेव्हिड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांना शाळेच्या बँड पथकाने सलामी दिली. सूत्रसंचालन विदर्ष त्रिपाठी आणि अंशरा खान यांनी केले. पाचवीतील विद्यार्थिनी राजवी रविशंकर हिने इंग्रजीतून, आठवीतील गौरी खोडके हिने मराठीतून आणि आर्यन भोगे याने हिंदीतून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर नृत्य आणि दांडपट्टा, तलवारबाजी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.

मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी म्हणाल्या की, एकविसाव्या शतकात विकसित भारत देश सुसंस्कृत, वैभवशाली, शक्तिशाली घडविण्यासाठी पीसीईटी कटिबद्ध आहे. उपमुख्याध्यापिका पद्मा बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिक्षण प्रसारक मंडळी निगडी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात

शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेची यमुनानगर, निगडी येथील शाळा यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उद्योजक अनिल भांगाडिया, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य हिरामण गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार,छत्री कवायत, फुलांची कवायत, लेझीमचे प्रात्यक्षिक सादर केले. भारतीय संविधान यावर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. राष्ट्र भक्तीपर गीत सादर केले. शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी मानसी गवंडगावे, शिक्षिका जयश्री कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विनी रासकर यांनी केले. मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन एच. ए. शाळेमध्ये उत्साहात साजरा

पिंपरीतील एच. ए. स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एच. ए. कंपनीच्या एम. डी. निरिजा सराफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी स्काऊट गाईड व आरएसपीच्या संचालन केले. राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही मुले या देशाची’ हे नृत्य सादर केले. माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी ‘होऊ सारे एक अखंड भारत’ हे गीत गायले. यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, शिक्षक प्रतिनिधी रमेश गाढवे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, पालक प्रतिनिधी व माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील खाद्यपदार्थ, प्राणी, पक्षी व वनस्पती या संदर्भामध्ये हस्तलिखित तयार केले होते. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांनी व्याकरणावर आधारित हस्तलिखित तयार केले होते व सातवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन स्थळे यावर हस्तलिखित तयार केले होते. याचे प्रकाशन निरिजा सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी नेत्रा गावडे हिने निरिजा सराफ यांचे रेखाटलेले चित्र सराफ यांना भेट देण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने अथलेटिक्स मैदानी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुषमा निरगुडकर, आभार मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण...

मुंबई/पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 32 तासांनंतर वाहतूक सुरळीत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 31 तासांनंतर गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडी...

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीचे विशेष सॉफ्टवेअर विकसित

पुणे —महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य...