पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – ना. चंद्रकांतदादा पाटील.

Date:

रोलबॉल स्टेडियम आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन व खेळाडूंचा सत्कार संपन्न.

पुणे- पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले, आईस स्केटिंग संस्थेचे अध्यक्ष व इंडियन ऑलम्पिक असोसिएशन चे सदस्य अमिताभ शर्मा यांनी केलेल्या मागणीवर ते बोलत होते. तुम्ही फक्त जागा द्या उभारणीचा खर्च आम्ही करू असेही श्री. शर्मा म्हणाले तोच धागा पकडून चंद्रकांतदादांनी हे वचन दिले. रोलबॉल ह्या खेळाने आता जागतिक पातळीवर मान्यता मिळविली असून पुण्यात जन्माला आलेल्या ह्या खेळासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवाडी भागात हे छोटेखानी स्टेडियम राखीव आहे असे मा. चंद्रकांतदादांनी नमूद केले.मात्र ते आच्छादित नसल्याने पावसाळ्यात वापर होत नाही तर उन्हाळ्यात त्याचा वापर करताना खेळाडूंची दमछाक होत असे हे लक्षात आल्यावर मी प्रयत्नपूर्वक यांस आच्छादित करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे आज भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
रोलबॉल च्या बालेवाडी येथील स्टेडियम ला आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर,इंडियन ऑलम्पिक असो. व आईस स्केटिंग चे अमिताभ शर्मा, रोलबॉल चे जनक राजू दाभाडे सर, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा रोलबॉल चे अध्यक्ष गजानन थरकुडे
नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मयुरी कोकाटे,स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोरसे साहेब,भाजपा चे मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, शिवम बालवडकर, राहुल कोकाटे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.
यावेळी दुबई विश्वचषक स्पर्धा ,तसेच
६ व्या खेलो इंडिया विंटर गेम लेह इथे आईस स्केटींग स्पीड प्रकारच्या स्पर्धा येथील विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.दिनांक २० ते २६ जानेवारी दरम्यान लेह इथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राची अन्वयी देशपांडे (पुणे) हिने 1000 मीटरमध्ये रौप्य व 500 मीटरमध्ये कांस्य पदक, झलीन फर्नंडिस (मुंबई) हिने 500 मीटर मध्ये रौप्य व 1000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावले.
रॉर्ट ट्रैक प्रकारात
ईशांत दारवेकर (पुणे) याने 1000 मीटरमध्ये सुवर्ण व 500 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले.
2000 मीटर मिक्स्ड रिले मध्ये
अन्वयी देशपांडे, शलीन फर्नांडिस, सोहन तारकर व ईशांत दारवेकर यांच्या संघाने सुवर्ण पदक मिळवले. प्रशिक्षक म्हणून श्री. निलेश शिंदे, (अहिल्यानगर) व सौ. जान्हवी चोरडिया (पुणे) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संघास श्री. सुहास पाटील उपसंचालक श्री. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक आणि सौ. अध्विनी थरीमखे क्रीडा अधिकारी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले तर श्री.उदय जोशी उपसंचालक आणि श्री.अरुण पाटील क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयीन कामाबाबत सहकार्य मिळाले.
तसेच दुबई इथे झालेल्या ७ व्या जागतिक रोल बॉल स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही संघानी विजय मिळवत विश्वचषक पटकावले. या मध्ये आपल्या पुण्यातील पुरुष संघातील खेळाडू कृष्णा यादगिरी, हर्शल घुगे, प्रतिक साठे, रोहन दाभाडे आणि दादा भोरे संघ व्यवस्थापक, महिला संघातील खेळाडू सुहानी सिंग, श्रुती भगत आणि प्रशिक्षक प्राची फराटे तसेच भरतीय संघाचे फ़िजिओ म्हणून डॉ. सायली पोतनीस, डॉ. अखिल डोंगरे आणि पंच संकेत आवळे, प्रभाकर वडवंराव,
स्पर्धा अधिकारी मिलिंद क्षीरसागर, चेतन भांडवलकर, महेश उभे, संदीप खर्डेकर, अमोल काजळे पाटील यांना मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे यांनी रोलबॉल च्या प्रगतीची माहिती दिली, खेळाचे जनक राजू दाभाडे सर यांनी प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इराणवर हल्ला करण्यास आमची मदत मिळणार नाही:स्पेनने USची 15 विमानं पिटाळून लावली

माद्रिद:स्पेन आपल्या सैन्य तळांचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी होऊ...

जातीयवादाच्या भस्मासुराच्या होळीत ट्रम्प च्या चित्राचीही पुण्यात होळी

पुणे : वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या...

युद्धास कारण अन शिया सुन्नी संघर्ष

इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील...