जातीयवादाच्या भस्मासुराच्या होळीत ट्रम्प च्या चित्राचीही पुण्यात होळी

Date:

पुणे : वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या विद्यमाने “सण करू साजरे – माध्यम जरा वेगळे” या संकल्पनेतून “जातीयवादाच्या भस्मासुराची होळी” तसेच Epstein Files प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लैंगिक शोषण, सत्तेचा गैरवापर आणि मानव तस्करीसारख्या अमानवी प्रवृत्तींच्या निषेधार्थ प्रतीकात्मक जेफ्री एप्सटिन, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क, बिल क्लिंटन यांचे पोस्टर दहन करून होळी साजरी करण्यात आली.

ही होळी गरवारे शाळेतील मुलींच्या हस्ते पेटवण्यात आली. जिजामाता, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यभूमीत स्त्रीशक्तीच्या सकारात्मक विचारांनी अन्याय, भेदभाव व शोषणाविरोधात ठाम संदेश देण्यात आला.
या उपक्रमाद्वारे समाजात जात-पात विसरून समानता, महिला सन्मान, बालसुरक्षा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, शहराध्यक्ष अमोल जगताप, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, आकाश जामगे, राज घाटे, अतिश जाधव, तेजस्विनी शिंदे, निकिता कांबळे, फातिमा शेख व मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम दि. २ मार्च, झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक, पुणे येथे घेण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्धास कारण अन शिया सुन्नी संघर्ष

इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी...

कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा...