युद्धास कारण अन शिया सुन्नी संघर्ष

Date:


इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील ऐतिहासिक जामकरण मशिदीवर लाल रंगाचा झेंडा फडकावला आहे. हा लाल झेंडा म्हणजे सूडाची नांदी असल्याचे मानले जात आहे. कारण या झेंड्यावर इमान हुसेन यांचा बदला असे शब्द लिहिलेले होते. पण हे इमान हुसेन कोण आहेत? त्यांच्या या बदल्याचा काय संदर्भ आहे? मशिदीवर लावलेल्या लाल झेंड्याचा नेमका अर्थ काय? हे सगळे समजून घ्यावे लागेल. कारण यातच शिया-सुन्नी संघर्षाचा इतिहास दडलेला आहे.

इमाम हुसेन म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा नातू. इमाम हुसेन 680 च्या करबलाच्या युद्धात मारले गेले. करबलाचे हे युद्ध वांशिक संघर्ष होता. त्या युद्धानंतर मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी अशी फूट पडली. काही रिपोर्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. सुन्नी परंपरेत खलिफा राज्य चालवतो, तर शिया परंपरेत इमामची निवड करणे ग्राह्य धरले जाते. इमाम म्हणजे पैगंबरांचे थेट वंशज. करबलाची लढाई मोहम्मद पैगंबराचे नातू इमाम हुसैन आणि खलिफा उमय्यद वंशाचे यजीद यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. पैगंबराच्या मृत्यूनंतर उमय्या वंशातल्या लोकांनी धर्माची आणि सत्तेची सगळी सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. हुसैन यांनी इस्लामच्या सिद्धांताचा आधार देत यजीदचे नेतृत्व स्वीकारायला नकार दिला आणि त्यानंतर करबलाचे युद्ध पेटले. इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहरमच्या महिन्यात दहाव्या दिवशी इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांचा मृत्यू झाला. तेव्हापासून शिया-सुन्नी हा संघर्ष सुरु असून तो आजतागायत सुरु आहे. या दिवसाचे शिया मुस्लिमांसाठी भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे मोहरमच्या काळात शिया मुस्लिम आजही ताजिया काढून लाल झेंडे फडकावत मातम करतात अर्थात दुःख व्यक्त करतात. इराणमध्ये शिया मुसलमान जामकरण या मध्ये मशिदीवर तेव्हाच लाल झेंडा फडकावतात, जेव्हा युद्धाची घोषणा होते किंवा त्यांच्या नेत्याचा मृत्यू होतो. सध्याच्या युद्धात इराणचे प्रमुख आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला असून इराण युद्धात आहे. हाच लाल झेंडा प्रामुख्याने इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी, शत्रूंना इशारा देण्यासाठी किंवा युद्धाच्या वेळी फडकवला जातो. शिया परंपरेतला हा झेंडा बदला घेण्याचे संकेत मानला जातो. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर शिया मुसलमानांनी लाल झेंडे अनेक ठिकाणी फडकावले आहे. या झेंड्याच्या माध्यमातून इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेला (Iran Israel War) तर इशारा दिला आहेच आपण सोबत सुन्नी मुस्लिम राष्ट्रे सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, कुवेत, कतार यांसह किमान १० राष्ट्रांच्या विरोधात युद्धाचे बिगुलही वाजवले आहे. त्यामुळे शिया-सुन्नी मुसलमानांच्या संघर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे संकेत मिळत आहेत.

शिया मुसलमानांची एकूण लोकसंख्या

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास व अंदाजानुसार, जगभरात शिया मुसलमानांची संख्या सुमारे 20 ते 26 कोटीं दरम्यान आहे. ही संख्या जागतिक मुस्लिम लोकसंख्येच्या अंदाजे 10 ते 13 टक्के इतकी आहे. म्हणजेच, जगातील प्रत्येक 100 मुसलमानांपैकी सुमारे 10 ते 13 जण शिया आहेत, तर उर्वरित बहुसंख्य मुसलमान सुन्नी पंथाचे आहेत. शिया समुदाय अनेक देशांत विखुरलेला असला, तरी काही देशांमध्ये त्यांची लोकसंख्या विशेषतः मोठ्या प्रमाणात आहे.

शिया मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश

शिया लोकसंख्येच्या बाबतीत इराण जगात अव्वल आहे. येथे शिया लोकसंख्या 8 ते 8.5 कोटी असून, देशाच्या एकूण लोकसंख्येतील वाटा 90 ते 95% आहे.

भारत

इराणनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया लोकसंख्या भारतात असल्याचे मानले जाते. भारतात शिया लोकसंख्या 3 ते 5 कोटी आहे. भारतातील मुस्लिम लोकसंख्येतील यांचा वाटा 10 ते 15% आहे. भारतात शिया समुदाय प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर, हैदराबाद आणि इतर काही भागांत आढळतो. लखनऊ हे शहर दीर्घकाळापासून शिया संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.येथे शिया लोकसंख्या 2.5 ते 4.5 कोटी आहे. एकूण मुस्लिम लोकसंख्येतील वाटा 10 ते 20% आहे.

इराक

इराकमध्ये शिया मुसलमान बहुसंख्य आहेत. मुस्लिम लोकसंख्येतील शिया वाटा 65 ते 70% असून, एकूण संख्या 2 ते 2.5 कोटी आहे.

अझरबैजान

शिया लोकसंख्या 65 ते 75% असून, इराणनंतरचा हे एक प्रमुख शिया बहुसंख्य देश आहे.

बहरीन

येथे शिया लोकसंख्या 65 ते 75% आहे. मात्र, येथे सत्ताधारी व्यवस्था सुन्नी राजघराण्याच्या हाती आहे.

लेबनॉन

येथे शियांची लोकसंख्या 45 ते 55% असून, लेबनॉनमध्ये शिया समुदाय राजकीयदृष्ट्याही प्रभावी मानला जातो.

येमेन

येथे शिया लोकसंख्या 35 ते 45% आहे. येथील बहुतांश शिया जैदी पंथाचे आहेत.

अफगाणिस्तान

येथे शिया लोकसंख्या 10 ते 15% आहे.

तुर्की

येथे शिया लोकसंख्या 1 ते 2 कोटी असून, येथे मोठ्या प्रमाणात अलेवी समुदाय आढळतो.

इतर देश

जॉर्जिया: 15 ते 25%

बल्गेरिया: 10 ते 15%

स्वीडन: मुस्लिम लोकसंख्येपैकी 20 ते 40% शिया

शिया बहुसंख्य देश किती?

जगात केवळ चार देश असे आहेत जिथे शिया मुसलमान बहुसंख्य आहेत:

इराण

इराक

अझरबैजान

बहरीन

या देशांमध्ये शिया लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. इतर देशांमध्ये शिया समुदाय अल्पसंख्य स्वरूपात राहतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी...

कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा...

युध्दग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी महापालिका उभारणार २४ बाय ७ कक्ष

पुणे- इराण-इस्रायल युद्धस्थिती बाबत पुणे महापालिकेने गांभीर्याने काम...