कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

Date:

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते व माअतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांचे प्रमुख उपस्थितीत शरदचंदजी पवार अकॅडमी ऑफ ई लर्निंग, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे ४११०४१ येथे कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले .
पुणे महानगरपालिका व जीविका फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ९ ते १३ वयोगटातील मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लसीची १ मात्रा मोफत देण्याबाबत करारनामा झाला असून, सदर लस सामाजिक दायित्व योजना यांचे माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अध्यक्षीय भाषणात महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले कि,”आजचा हा क्षण केवळ औपचारिक कार्यक्रम नाही, तर एक ऐतिहासिक पाउल आहे. महानगरपालिका स्तरावर अशा प्रकारचा उपक्रम सुरु करणारी पुणे महानगरपालिका हि देशातील पहिली महानगरपालिका ठरत आहे. याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.या राष्ट्रीय मिशनला पूरक आणि अधिक बळकटी देण्यासाठी पुणे महानगरपालिका, जीविका फौंडेशन आणि CSR भागीदार यांच्या सहकार्याने आम्ही एक पाउल पुढे टाकत आहोत. मोफत HPV लसीकरणाद्वारे ९ ते १३ वयोगटातील सर्व मुलींना सर्व समावेशक संरक्षण मिळेल आणि पुणे शहरात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक मजबूत संरक्षण कवच उभे राहील हे अभियान आपल्या शहरातील मुलींच्या आरोग्याचे आणि त्यांच्या उज्वल भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाउल आहे”.
यावेळी परशुराम वाडेकर, सोपान चव्हाण, स्मिता वस्ते, अल्पना वर्षे,पल्लवी जावळे, ज्योती गोसावी, सचिन मोरे आणि श्रीकांत जगताप, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करण्यात आले.सदर प्रसंगी पुणे महानगरपालिकेस मोफत लस उपलब्ध करून देणारे समाजिक दायित्व योजना भागीदार Bajaj Finserv, Bridgenext, Compucomp, Caratlane, Icertis, Indostar, Lohia Jain Group, Pattern Tech, Shreejee Structural Steel, ZS Associates, Rotary Club Poona, Downtown, Rotary Club Pune Central यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांचा महापौर यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिग्नेश पटेल, संचालक जीविका फौंडेशन यांनी प्रेक्षकामध्ये उपस्थित असणाऱ्या १५० मुलामुलींना व त्यांच्या पालकांना आजवर जीविका फौंडेशनच्या माध्यमातून सुमारे ५०,००० विद्यार्थिनींचे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) प्रतिबंधक लस देण्यात आल्याचे सांगितले. यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांनी सदर लस अत्युच्च दर्जाची असून योग्य तापमानात सनियंत्रित केली असल्याने प्रभावी असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थिनींनी इंजेक्शनची भीती न बाळगता लस घ्यावी तसेच एखाद्या विद्यार्थिनीस थोडा ताप येणे, इंजेक्शनच्या जागी सूज येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्याकरीता AEFI KIT उपलब्ध असल्याचे सांगितले.
महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये ९ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींना लसीच्या उपलब्धतेनुसार मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगितले व त्याकरीता अधिकाधिक सामाजिक दायित्व योजना अनुदानाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच सदर वयोगटातील शाळा बाह्य मुलींना या लसीची तितकीच आवश्यकता असल्याचे व त्यासाठी विशेष प्रयत्र करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यानंतर महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते फीत कापून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी ७५ विद्यार्थिनींना CERVIVAC लसीचा एक डोस देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात ५ मुलींना लसीकरणाचे प्रमाणपत्र माननियांच्या हस्ते देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लसीकरण अॅम्ब्युलंस वाहनास माननियांच्या व विद्यार्थिनींच्या हस्ते झेंडा दाखवून अभियानास सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे, आरोग्य विभागाकडील अधिकारी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षण मंडळ उपायुक्त श्रीमती वसुंधरा बारवे, श्रीमती सुनंदा वाखारे व शिक्षण विभागाकडील अन्य अधिक्कारी कर्मचारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.यानंतर सर्व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दि.२८ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत १४ वर्षापर्यंतच्या मुलींना HPV लसीकरणाचा समावेश करून एक दूर दृष्टीपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा एक क्रांतिकारक टप्पा आहे.भारतामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. ICMR अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार २०२२ साली सुमारे ७९,००० नवीन रुग्ण आणि ३४,००० पेक्षा जास्त मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाले आहेत. या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे Human Papillomavirus (HPV) संसर्ग होय.HPV Papillomaviridae कुटुंबातील विषाणू असून त्याचे २०० पेक्षा अधिक प्रकार आहेत. यापैकी HPV-16 आणि HPV-18 हे प्रकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी सर्वाधिक जबाबदार आहेत. भारतामध्ये सुमारे ८३% रुग्णांमध्ये हे दोन प्रकार आढळतात. त्यामुळे HPV लसीकरण अत्यंत प्रभावी ठरते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी...

युध्दग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी महापालिका उभारणार २४ बाय ७ कक्ष

पुणे- इराण-इस्रायल युद्धस्थिती बाबत पुणे महापालिकेने गांभीर्याने काम...

पुणे मेट्रोच्या तिकीट तपासणीच्या (AFC) गेटमध्ये बदल

पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीच्या (AFC) गेटमध्ये...