मुली मुलांपेक्षा अधिक तंदुरुस्त:3 पैकी फक्त 1 शालेय विद्यार्थी धाप न लागता धावू शकतो-स्पोर्ट्झ व्हिलेजच्या 14व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातून उघड

Date:

14 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणात 112 शहरांतील 333 शाळांमधील 1,41,840 मुलांची तपासणी करण्यात आली – भारतातील आतापर्यंतचा सर्वात व्यापक शालेय फिटनेस संशोधन अभ्यास

बंगळुरू, 2 मार्च 2026 — भारतातील आघाडीची शालेय क्रीडा संस्था स्पोर्ट्झ व्हिलेज एज्युस्पोर्ट्सने आज त्यांच्या महत्वपूर्ण अशा 14व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षण (AHS) 2026 चे निष्कर्ष जाहीर केले. 112 शहरांतील 333 शाळांमधील 1,41,840 मुलांचा समावेश असलेल्या या अहवालात कोविडनंतरचा फिटनेस, आरोग्य स्वास्थ्य यामधील सुधारणा याबाबत पुराव्यावर आधारित निरीक्षणे, सुसूत्र शारीरिक शिक्षण (P.E.) याचा निर्णायक प्रभाव आणि तातडीची सुव्यवस्थित कृती करणे गरजेचे असलेल्या सतत भेडसावणाऱ्या आरोग्यत्रुटी यांचा सखोल आढावा सादर केला आहे.

2010 मध्ये सुरू करण्यात आलेले वार्षिक आरोग्य सर्वेक्षण भारतातील मुलांच्या शारीरिक आरोग्याचा निश्चित निर्देशक बनले आहे. 14व्या आवृत्तीत बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), एरोबिक कॅपॅसिटी,  अॅनएरोबिक कॅपॅसिटी, अपर बॉडी स्ट्रेंथ, लोअर बॉडी स्ट्रेंथ, कोर /ॲब्डॉमिनल स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी या सात प्रमुख घटकांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यामुळे भारतातील मुले कशा प्रकारे वाढत आहेत याचा वैशिष्ट्यपूर्ण दीर्घकालीन आढावा उपलब्ध होतो.

भारतामधील प्रत्येक तीनपैकी दोन शालेय मुले मूलभूत हृदय-श्वसन क्रिया व्यायाम सातत्याने करू शकत नाहीत. एरोबिक फिटनेस हा आयुष्यभरातील हृदयविकाराच्या आरोग्याचा सर्वात मजबूत निर्देशक आहे आणि बालपणातील त्याचा अभाव प्रौढावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग याकडे थेट नेणारा मार्ग आहे. सर्व शाळांमध्ये, गेल्या 14 वर्षांत सर्वेक्षणाने नोंदवलेली ही सर्वात चिंताजनक आणि सर्वात ठळक आरोग्य त्रुटी आहे.


यासोबतच, 40% मुले निरोगी बीएमआय श्रेणीच्या बाहेर आहेत आणि कोविडनंतरच्या तीन वर्षांच्या सुधारणा कालावधीतही या आकड्यात फारसा बदल झालेला नाही (2023 मध्ये 59.1% निरोगी; 2025 मध्ये 59.6%). यावरून स्पष्ट होते की शरीरस्वास्थ्य केवळ शालेय शारीरिक शिक्षणावर  विसंबून सुधारणार नाही. सातत्यपूर्ण जीवनशैलीतील बदलांना शरीर अधिक प्रतिसाद देते. याशिवाय, 49% मुले अपर बॉडी स्ट्रेंथच्या निकषांपर्यंत पोहोचत नाहीत आणि 44% मुले लोअर बॉडी स्ट्रेंथ मध्ये कमी पडतात. त्यातून निष्क्रिय, स्क्रीनवर अवलंबून आणि शारीरिकदृष्ट्या अपुरी वाढ होत असलेली पिढी दिसून येते.

स्पोर्ट्झ व्हिलेजचे सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सौमिल मजमुदार म्हणाले, “या वर्षीचे निष्कर्ष हे निरोगी बालपण जाणीवपूर्वक घडवले जाते या आम्ही नेहमी मानत आलो त्या विश्वासाला अधिक बळकटी देतात. आजच्या काळात, जेव्हा मुले वाढत्या जीवनशैली-संबंधित आरोग्य जोखमींना आणि वाढत्या भावनिक तणावांना सामोरे जात आहेत, तेव्हा लवकर वयात निरोगी सवयी निर्माण करणे कधी नव्हे इतके महत्त्वाचे झाले आहे. मुलांची हालचाल व्हावी यासाठी सुव्यवस्थित संधी निर्माण करून शाळा यात महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु दीर्घकालीन परिणाम तेव्हाच साध्य होतो जेव्हा कुटुंबे आणि समुदायही त्याच वातावरणाला पाठिंबा देतात. देश म्हणून, आपण मोठ्या प्रमाणावर मुलांच्या स्वास्थ्याचा मागोवा घेणे आणि समजून घेणे, आकलन करणे सुरू ठेवले पाहिजे. तरच आपण अर्थपूर्ण आणि सामूहिक प्रतिसाद देऊ शकू. आज जाणीवपूर्वक कृती करून येणाऱ्या वर्षांसाठी अधिक निरोगी आणि आनंदी बालपण घडवणे ही आपल्या समोरची संधी स्पष्ट आहे.”

कोविडचा धक्का आणि पुनरागमन

2020 मध्ये, महामारीपूर्व काळात, 70.5% विद्यार्थी एकूण फिटनेस निकष पूर्ण करत होते. 2022 पर्यंत दोन वर्षे बंद असलेल्या शाळा आणि निष्क्रिय लॉकडाऊननंतर, हा आकडा घसरून 56.2% वर आला. सर्वेक्षणाच्या 14 वर्षांच्या इतिहासातील फिटनेस संदर्भातील घसरणीचा हा सर्वात तीव्र टप्पा होता.

चांगली बातमी म्हणजे मुलांनी पुन्हा उभारी घेतली. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर आणि सुव्यवस्थित व्यायाम क्रिया, उपक्रम पुन्हा सुरू झाल्यानंतर फिटनेस झपाट्याने वाढला आणि 2024 मध्ये 84.4% आणि 2025 मध्ये 84.8% पर्यंत पोहोचला. त्याने कोविडपूर्व पातळी ओलांडली. मात्र एरोबिक फिटनेस 2023 मध्ये केवळ 27.5% वरून 2025 मध्ये 34.4% पर्यंत वाढला. त्यामुळे तो सर्वात कमकुवत घटक राहिला आणि त्यात केवळ मर्यादित वाढ झाली.

सर्वेक्षणातील सर्वात निर्णायक निष्कर्ष असा आहे: सलग दोन वर्षे व्यवस्थित शारीरिक शिक्षण  कार्यक्रमात सहभागी राहिलेल्या विद्यार्थ्यांचा एकूण फिटनेस 66% वरून 82% पर्यंत सुधारला.  म्हणजेच केवळ दोन वर्षांत 16 टक्के गुणांची वाढ झाली. वर्षाला 80 पेक्षा अधिक शारीरिक शिक्षण सत्रे घेणाऱ्या शाळांमध्ये 86% एकूण फिटनेस नोंदवला गेला. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की सुव्यवस्थित आणि सातत्यपूर्ण शारीरिक शिक्षण प्रभावी ठरते. प्रश्न असा आहे की अजूनही त्याला अत्यावश्यक का मानले जात नाही?

मुली मुलांपेक्षा अधिक तंदुरुस्त

मुली सातपैकी पाच फिटनेस घटकांमध्ये मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत: बीएमआय (62% विरुद्ध 57%), लवचिकता (73% विरुद्ध 68%), पोट आणि शरीराच्या मध्यवर्ती भागाची ताकद (88% विरुद्ध 86%), शरीराच्या वरच्या भागाची ताकद (53% विरुद्ध 45%) आणि अॅनएरोबिक कॅपॅसिटी (65% विरुद्ध 63%). अलीकडील वर्षांतील अधिक समावेशक शारीरिक शिक्षण कार्यक्रमांचा हा सकारात्मक परिणाम आहे.

परंतु केवळ 27% मुलींकडे निरोगी एरोबिक क्षमता आहे, तर मुलांमध्ये हा आकडा 41% आहे.  म्हणजेच 14 टक्के गुणांची तफावत संपूर्ण सर्वेक्षणातील सर्वात मोठी लिंग-आधारित दरी आहे. मुली अधिक मजबूत आणि अधिक लवचिक आहेत. त्या धावू शकत नाहीत. जर या एरोबिक तफावतीकडे लिंग-संवेदनशील शारीरिक शिक्षण दृष्टीकोनाद्वारे लक्ष दिले नाही तर ही समस्या हळूहळू दीर्घकालीन आरोग्यविषयक असमानतेचे रूप घेईल.

सरकारी शाळांतील मुले खाजगी शाळांतील मुलांपेक्षा अधिक तंदुरुस्त

सरकारी आणि सार्वजनिक शाळांतील मुले सातपैकी पाच फिटनेस घटकांमध्ये खाजगी शाळांतील मुलांपेक्षा सरस आहेत. त्यात एरोबिक क्षमता (40% विरुद्ध 33%), अॅनएरोबिक क्षमता (81% विरुद्ध 62%) आणि लवचिकता (78% विरुद्ध 69%) यांचा समावेश आहे. नुसत्या अॅनएरोबिक घटकातच 19 टक्के गुणांची तफावत आहे. अधिक दैनंदिन हालचाल, अधिक मैदानी खेळांसाठीचा वेळ आणि कमी बसणे या गोष्टी पायाभूत सुविधांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात. खाजगी शाळा केवळ शरीराच्या वरच्या भागाची ताकद यामध्ये आघाडीवर आहेत. दीर्घकालीन आरोग्याचा अंदाज देणाऱ्या जवळजवळ सर्व घटकांमध्ये पब्लिक स्कूल मधील मुले पुढे आहेत.

या माहितीतून हे स्पष्टपणे दिसून येते की मुलांचे आरोग्य ही सामायिक जबाबदारी आहे. ताटातील अन्न, मैदानी खेळ खेळण्याचा वेळ, झोपेच्या वेळी बंद केलेली स्क्रीन या दृष्टीने पालक ही पहिली संरक्षणरेषा आहेत. परंतु शाळांनीही तितकीच जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मुले त्यांच्या आयुष्याचा एक तृतीयांश काळ वर्गखोल्यांमध्ये घालवतात आणि तिथेच संरचनात्मक, सामूहिक बदल घडू शकतो. सर्वेक्षणाचे निष्कर्ष स्पष्ट करतात की वेळापत्रकात खेळाचा तास ठेवणे म्हणजे फिटनेस निर्माण करणे नव्हे. मैदानी खेळ म्हणजे काही नुसता सुव्यवस्थित रचना केलेला कार्यक्रम नाही. 14 वर्षांच्या आकडेवारीने, माहितीने हे सिद्ध केले आहे की जाणीवपूर्वक, मूल्यमापन-आधारित दृष्टिकोनच खरा बदल घडवतो. असा दृष्टीकोन प्रत्येक घटकाचा मागोवा घेतो, प्रत्येक मुलाचा विकास करतो आणि अतिरिक्त शैक्षणिक तासासाठी शारीरिक शिक्षणाचा तास शांतपणे काढून टाकला जाणार नाही याची ठामपणे काळजी घेतो. भारतात जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे. त्याचवेळी, काही सर्वात कमी सक्रिय असलेली शालेय मुलेही येथेच आहेत. ही दोन्ही तथ्ये किंमत मोजल्याशिवाय एकत्र राहू शकत नाहीत. 14 वे वार्षिक आरोग्य सर्वेक्षण म्हणजे ही किंमत मोजलेला केवळ एक दस्तावेज नाही. या सर्वेक्षणातून ही किंमत मोजायला कशी लागणार नाही याचेही व्यवस्थित मार्गदर्शन केले आहे.

संपूर्ण अहवाल Link येथे उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाईनमन – उजेड देणारा माणूस

लाईट गेल्याशिवाय लाईटची किंमत कळत नाही असे म्हणतात. पण...

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय:आता 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ

मुंबई-मुंबई महापालिकेत महायुती सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा देत मालमत्ता...

युद्धामुळे सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला:सोन्याचे दर 5 हजारांनी वाढून 1.67 लाखांवर पोहोचले

कच्चे तेल 10% वाढून 79 डॉलरवर पोहोचले मुंबई-अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे आज,...

इराण-इस्रायल युद्ध, जम्मू-काश्मिरच्या अनेक जिल्ह्यांत कर्फ्यूसदृश स्थिती,इराणमध्ये 10 हजार तर 40,000 हून अधिक भारतीय इस्त्रायलमध्ये

जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांचा जमावावर लाठीचारजम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये,...