मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय:आता 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ

Date:

मुंबई-मुंबई महापालिकेत महायुती सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा देत मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे युतीने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता मानली जात असून, नव्या महापौरांच्या माध्यमातून मुंबईकरांना ही मोठी भेट मिळाली आहे.

या निर्णयापूर्वी मुंबईत केवळ 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळत होती, मात्र आता 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. या सवलतीमुळे मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी महापालिकेच्या तिजोरीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे पालिकेला दरवर्षी सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार आहे.

मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत सदनिका मिळतात, मात्र 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर भरणे अनेकदा त्यांच्या आर्थिक क्षमतेबाहेर असते. वाढती महागाई, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचारांचा खर्च पेलतानाच, गृहनिर्माण संस्थांचे देखभाल-दुरुस्ती शुल्क आणि मालमत्ता कराचा अतिरिक्त भार मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडत नाही. या आर्थिक ओझ्यामुळे हक्काचे घर असूनही अनेक मूळ मुंबईकरांना आपली सदनिका विकून शहराबाहेर स्थलांतर करावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ही प्रतिकूल परिस्थिती रोखण्यासाठी आणि मूळ मुंबईकर मुंबईतच राहावा या उद्देशाने, मालमत्ता कर माफीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मुंबई महानगरपालिकेने व्यक्त केले आहे. त्याअनुषंगाने, 700 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे रीतसर निवेदन सादर करण्याची विनंतीही महापौरांना करण्यात आली असून, यामुळे लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते यशोधर फणसे यांनी मांडलेला हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आता प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत असून, तो विभागीय अधिकारी आणि विधी व कायदे विभागाकडून कायदेशीर पडताळणीसाठी पाठवला जाणार आहे. या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध होऊन 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत प्रत्यक्ष लागू होईल. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अमलात येणाऱ्या या निर्णयामुळे मुंबईतील हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुली मुलांपेक्षा अधिक तंदुरुस्त:3 पैकी फक्त 1 शालेय विद्यार्थी धाप न लागता धावू शकतो-स्पोर्ट्झ व्हिलेजच्या 14व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातून उघड

14 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणात 112 शहरांतील 333 शाळांमधील 1,41,840 मुलांची तपासणी करण्यात आली – भारतातील...

युद्धामुळे सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला:सोन्याचे दर 5 हजारांनी वाढून 1.67 लाखांवर पोहोचले

कच्चे तेल 10% वाढून 79 डॉलरवर पोहोचले मुंबई-अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे आज,...

इराण-इस्रायल युद्ध, जम्मू-काश्मिरच्या अनेक जिल्ह्यांत कर्फ्यूसदृश स्थिती,इराणमध्ये 10 हजार तर 40,000 हून अधिक भारतीय इस्त्रायलमध्ये

जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांचा जमावावर लाठीचारजम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये,...

पेहेल-२०२६ अभियानाचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे उद्घाटन समारंभ संपन्न

शहरातील ६५० हून अधिक संकलन केंद्रांवर प्लास्टिक व ई-कचरा...