ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश:कस्पटे मिसिंग लिंकची उच्च न्यायालयाकडूनही दखल

Date:

जमीन संपादित करुन काम जलदगतीने पूर्ण करुन न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे!

ना. पाटील यांच्या आयुक्तांना सूचना

पुणे- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, उच्च न्यायालयानेही कस्पटे मिसिंग लिंकची गांभीर्याने दखल घेतली असून, सदर रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ना. पाटील यांनीही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करुन आयुक्तांना संपर्क साधत जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत सूचित केले आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बालेवाडी-वाकडला जोडणारा पूल आणि त्याला जोडणारा कस्पटे वस्तीची मिसिंग लिंक पूर्ण होऊन नागरिकांची वाहतूककोंडीतून मुक्तता व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने सदर पूल आणि मिसिंग लिंकसाठी दोन आठवड्यांपूर्वी आयुक्तांसोबत बैठक घेऊन, आढावा घेतला होता. तसेच, सदर काम अतिशय संथगतीने सुरु असल्याबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. या बैठकीत खासगी मालकीच्या दोनशे मीटर जागेच्या जमीन संपादनाचे काम उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे रखडले असल्याने यातील कायदेशीर अडचणींबाबत ना. पाटील यांना अवगत केले होते.

त्यावर ना. पाटील यांनीही महापालिकेच्या वतीने प्रभावी बाजू मांडून, या रस्त्याची आवश्यकता माननीय न्यायलयाच्या निदर्शनास आणून देण्याबाबत आयुक्तांना सूचित केले होते. त्यानुसार, महापालिकेने उच्च न्यायालयात सदर विषयाच्या सुनावणीवेळी रस्त्याची आवश्यकता आणि यामुळे सुटणारा वाहतूककोंडीचा प्रश्न याबाबत न्यायालयासमोर बाजू मांडली. न्यायालयानेही याचे गांभीर्य ओळखून सदर मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी आवश्यक जमीन संपादनावरील स्थगिती उठवून, एक वर्षाच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.

दरम्यान, या निकालाचे ना. पाटील यांनीही स्वागत केले असून, त्यांनी तात्काळ महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून, रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करुन, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे असे सूचित केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कौतुक

पुणे : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन (एमईए) यांच्या वतीने आयोजित...

‘डिजिटल अरेस्ट’धमकी : 10.74 कोटींची फसवणूक:दोन तरुण पकडले

पुणे- सायबर पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची...

ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. २८ : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व...