काश्मीर च्या लाल चौकात शोक:श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर: अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी लाल चौकात लोक मोठ्या संख्येने जमले.
इराणमध्ये, सर्वोच्च नेते हे केवळ धार्मिक नेते नाहीत.इराणचे सर्वोच्च नेते हे केवळ धार्मिक नेते नाहीत. ते सरकार, लष्कर, समाज आणि अर्थव्यवस्था यांचे प्रमुख असतात आणि ते देशाचे प्रमुख देखील असतात.इराणी संविधानानुसार, त्यांना जगभरातील शिया मुस्लिमांचे नेते देखील मानले जाते आणि त्यांना विशिष्ट धार्मिक अधिकार आहेत. म्हणूनच, त्यांचे आदेश आणि निर्णय प्रत्येक इराणीसाठी आवश्यक मानले जातात.
अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या तसनीम आणि फार्स या वृत्तसंस्थांनी याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे.
खामेनी यांच्या निधनानंतर इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दुःख व्यक्त केले आहे. इराणी वृत्तसंस्था फार्सनुसार, IRGC ने म्हटले आहे की, ‘आम्ही एक महान नेता गमावला आहे आणि संपूर्ण देश त्यांचा शोक करत आहे.’
इराणी सैन्याने एका धोकादायक मोहिमेच्या सुरुवातीची घोषणा केली आहे. सैन्याने सांगितले की, हा हल्ला लवकरच सुरू होईल आणि प्रदेशातील व्याप्त क्षेत्रे तसेच अमेरिकेच्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करेल.
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करून म्हटले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक खामेनी मारला गेला. हा इराणच्या जनतेसाठी तसेच अमेरिका आणि जगभरातील देशांसाठी न्याय आहे.
अयातुल्ला अली खामेनी कोण ?…
अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी इराणमधील धार्मिक शहर मशहद येथे एका मौलवी कुटुंबात झाला होता. ते खोमेनी शाहच्या धोरणांविरुद्ध होते आणि इस्लामिक शासनाचे समर्थन करत होते.
1963 मध्ये शाहविरुद्ध भाषण दिल्याबद्दल त्यांना अटकही करण्यात आली. हळूहळू ते सरकारविरोधी आंदोलनाचा एक मोठा चेहरा बनले आणि खोमेनीचे विश्वासू सहकारी मानले जाऊ लागले.
1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि शाहचे सरकार कोसळले. खोमेनी देशात परतले आणि त्यांनी नवीन इस्लामिक सरकार स्थापन केले. खामेनी यांना क्रांतिकारी परिषदेत स्थान मिळाले आणि नंतर त्यांना उप संरक्षणमंत्री बनवण्यात आले.
1981 मध्ये तेहरानमधील एका मशिदीत भाषण देत असताना खामेनी यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला. त्याच वर्षी आणखी एका बॉम्बस्फोटात तत्कालीन राष्ट्रपतींचा मृत्यू झाला. यानंतर झालेल्या निवडणुकीत खामेनी प्रचंड बहुमताने निवडून इराणचे तिसरे राष्ट्रपती बनले.
1989 मध्ये खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनेई यांना देशाचे सर्वोच्च नेते म्हणजेच ‘रहबर’ बनवण्यात आले. यासाठी संविधानात बदलही करण्यात आले. समर्थक त्यांना इस्लामी व्यवस्थेचे मजबूत रक्षक मानतात, तर टीकाकार त्यांच्यावर कठोर आणि कट्टर शासन चालवल्याचा आरोप करतात.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथेही इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्युच्या निषेधार्थ निदर्शने होत आहेत. शिया समुदायाचे सदस्य खामेनी यांचे फोटो हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत.

