पुणे- माणिकबाग, सिंहगड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या प्रगतीपथावरील नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करण्यात आली.या पाहणीदरम्यान महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे,आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता पावसकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामाचा सविस्तर आढावा घेऊन नाट्यगृहाचे बांधकाम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान चव्हाण, कोमल नवले, जयश्री भूमकर, ज्योती गोसावी, स्नेहलता कोल्हे व पदाधिकारी उपस्थित होते.परिसराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारे हे नाट्यगृह लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

