जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’वर भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

Date:

— राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र प्रदेश

पुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) निमित्त पुणे शहरातील गुडलक चौक येथे असलेल्या ऐतिहासिक ‘कलाकार कट्टा’वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागा चे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बाबासाहेब पाटील म्हणाले कि,’ अलीकडे काही भाजप नगरसेवकांनी हा कलाकार कट्टा हटवण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी भाषा, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कलाकार कट्टा हा केवळ चित्रकारांचा नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कलाकार, लोककलावंत, साहित्यिक, तरुण-तरुणी आणि कला रसिक यांचा मुक्त अभिव्यक्तीचा मंच आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी विविध कलाप्रकार सादर होत असून, पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा तो अविभाज्य भाग बनला आहे.
आजच्या कार्यक्रमात राज्यभरातील लोककलावंत, गायक, वादक, नृत्यकलावंत, चित्रकार तसेच विविध कलाक्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. मराठी भाषेचा गौरव आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, कलाकार कट्टा हटवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. कला, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सर्व कलाकार आणि पुणेकर नागरिक एकजूट आहेत.
जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सातत्यपूर्ण शिक्षणात दडलेली असते उत्कृष्टता–पियुष अग्रवाल

पुणे:भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग  पुणे येथे ‘भारतीयम -२०२६’ या राष्ट्रीय...

लैंगिक छळाच्या प्रकरणात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अटकेला स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लैंगिक छळाच्या प्रकरणात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद...

लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; परिसरात धुराचे मोठे लोट, नागरिकांच्या...