सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

Date:

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवून पर्यावरणाचा शाश्वत विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्ती, नागरिक,संस्था,सोसायटी यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचे मिळकतीच्या करामध्ये अतिरिक्त १०% सवलत देण्यात यावी असा प्रस्ताव नगरसेवक स्वप्नील दुधाने आणि हर्षवर्धन मानकर यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे ज्यावर आज स्थायी समिति अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय केला जाणार आहे

नगरसेवक स्वप्नील दुधाने आणि हर्षवर्धन मानकर यांनी आपल्या प्रस्तावात के म्हटले आहे वाचा प्रस्ताव जसाच्या तसा…

पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील निवासी मिळकतीमध्ये सौरउर्जा वापर, ओला व सुका कचरा वेगळा करून गांडुळखत प्रकल्प, पावसाच्या पाण्याची साठवणूक करून ते पुन्हा रिसायकलिंग करून वापरात आणणे (रेन हार्वेस्टिंग) या ०३ प्रकल्पांपैकी एक प्रकल्प राबविला असल्यास ५% व दोन प्रकल्प राबविले असल्यास १०% याप्रमाणे निवासी मिळकतधारकाच्या मिळकतीस चालू करांमध्ये (शासनाच्या कराव्यतिरिक्त) सूट दिली जाते आहे. मा. मुख्य सभा ठराव क्र. ८५ दि. १३/०७/२०६७ व मा. महापालिका आयुक्त ठराव क्र. ६/७९६ दि. २७/०१/२००९ नुसार सन २००७-०८ पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
आजमीतीस संपूर्ण जगामधील अनेक शहरे प्रदूषणाने ग्रासले गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतातील प्रमुख शहरांमधील प्रदूषणाची पातळी खूप खालावली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता पुणे महानगरपालिका सुद्धा प्रयत्नशील असल्याचे काही प्रमुख योजनांमधून दिसून आले आहे. ज्यामध्ये वरील योजनेचा देखील समावेश आहे. याचअनुषंगाने एक महत्त्वाच्या पर्यावरणपूरक योजनेअंतर्गत अजून एक योजनेचा समावेश करावा यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
जगामधील वायु प्रदूषणाकरिता सर्वात महत्त्वाचे दोन प्रमुख स्त्रोत कारणीभूत आहे. ज्यामध्ये कोळसाद्वारे होणारी वीज निर्मिती व इंधनाद्वारे होणारे वायू प्रदूषण, ज्याप्रमाणे इंधानाद्वारे होणारे वायू प्रदूषणबाबतच्या उपाययोजनेसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, नागरिक जागरूक आहेत त्याप्रमाणे वीजनिर्मितीद्वारे होणा-या प्रदुषणाबाबत थोडेसे दूर्लक्ष होत आहे. परिणामी वायू प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

एक जबाबदार जागरूक नागरिक म्हणून पर्यावरणीय समतोल राखणारा म्हणजेच सोलर द्वारे वीज निर्मिती करणारा प्रकल्प आज अनेक इमारती तसेच सोसायटीमध्ये उभारले जात आहे. यामध्ये केवळ सौरउर्जेचा वापर करून गरम पाणी वापरणे इतपतच उद्देश नसून मुख्य वीज वापर बंद करून सौरउर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करून त्याचा वापर केला जात आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे अशा प्रकल्पांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे जेणेकरून पर्यावरणीय संतुलन राखणेसाठी मोठा हातभार लागेल. या सोलर उर्जा उपक्रमाचे काही महत्त्वाचे फायदे थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत.
सोलर ऊर्जा (सौर ऊर्जा) ही अक्षय, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा मुख्य स्रोत असल्याने आज अत्यंत आवश्यक आहे. हे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करते, वीज बिलात मोठी बचत करते आणि पर्यावरणाचे रक्षण करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते.
सोलर ऊर्जेची आवश्यकता आणि फायदेः
अक्षय आणि अमर्याद स्रोतः सूर्यप्रकाश कधीही न संपणारा (renewable) ऊर्जेचा स्त्रोत आहे. जो कोळसा किंवा तेलासारखा मर्यादित नाही.
पर्यावरण पूरक (Clean Energy): सोलर पॅनेल विजेची निर्मिती करताना कोणत्याही प्रकारचे हानिकारक हरितगृह वायू उत्सर्जित करत नाहीत, ज्यामुळे हवामान बदल रोखण्यास मदत होते.
ऊर्जा स्वातंत्र्य : सोलर सिस्टमच्या माध्यमातून शहरी भागात जास्त प्रमाणात वीज निर्मिती झाल्यास आपण उर्जा निर्मितीच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतो. तसेच यामुळे शहरी भागात होत असलेला बीजपुरवठा दुर्गम भागात / गाव खेड्यामध्ये जेथे वीजपुरवठा अत्यल्प आहे, लोडशेडींग मोठ्या प्रमाणात होते, त्याठिकाणी हस्तांतरित केल्यास तेथील भागासाठी, शेतीसाठी ही बाब खूप उपयोगी होईल.
पर्यावरणाच्या हिताकरिता प्रकल्प म्हणजे सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवून पर्यावरणाचा शाश्वत विकासाला हातभार लावणात्या व्यक्ती, नागरिक, संस्था, सोसायटी यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचे मिळकतीच्या करामध्ये अतिरिक्त १०% सवलत देण्यात यावी अशी आग्रही मागणी आहे. तथापि अशा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. याकरिता केवळ आश्वासन नको, कृती आवश्यक आहे आणि याचे पहिले पाऊल पुणे महानगरपालिकेने उचले पाहिजे. यामुळे अधिकाधिक व्यक्ती, नागरिक, संस्था, मोसायटी सोलर एनर्जी प्रकल्प राबविणेसाठी पुढाकार घेतील. याद्वारे कोळशाच्या आधारित वीजेवरील अवलंबित्व कमी होऊन सोलर एनर्जी प्रकल्पाकडे नागरिकांचा कल राहील. जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणान्या जीवात्म इंधनावरील गोष्टीचा वापर कमी होण्यासाठी आपल्या महानगरपालिकेचा हा उपक्रम अभिमानास्पद ठरू शकेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...