अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

Date:

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजय
पिंपरी : पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. एकूण १४ खेळाडू, संघव्यवस्थापक आणि मार्गदर्शकांसह महापालिकेच्या दोन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.सदर संघात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, अग्निशामक विभाग, सुरक्षा विभाग, पाणीपुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षण मंडळ, क्रीडा विभाग, कीटकनाशक विभाग आणि उद्यान विभाग अशा विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. विभागनिहाय एकत्रित सहभागामुळे या विजयाला अधिक व्यापक आणि प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले.

अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महापालिका ‘अ’ संघाने जबरदस्त खेळ कौशल्य सादर करत पुणे शहर पोलीस संघाचा २–० असा धुव्वा उडवला. संघातील कर्णधार सुहास नाईक, उपकर्णधार दशरथ वाघोले, सोमनाथ वीर, विजय गांगुर्डे, अजय घोगरे, संस्कार चव्हाण आणि अंकुश लोहकरे यांनी उत्कृष्ट खेळी करून संघाची ताकद अधोरेखित केली.

तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका ‘ब’ संघाने देखील भक्कम कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळवला. ‘ब’ संघात हरिभाऊ साबळे, सोमनाथ मोरे, राजवैभव महजराव, हर्षद कदम आणि घनश्याम कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. दोन्ही संघांना क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांनी केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन यशप्राप्तीमध्ये महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे, महापालिकेने या अंतरकचेरी स्पर्धेत सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवत ऐतिहासिक कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन्ही संघांनी दाखवलेला जिद्द, संघभावना आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडू आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन.” — रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव पाणीप्रश्नावर ठोस पावले; आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक व पाहणी

पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी...

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून...

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन...