राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी प्रसिद्ध

Date:

पुणे, दि. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, माध्यम, प्रश्नपत्रिका संचकोड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ५ मार्च २०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ब्रिस्टॉल विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या...

उद्योगांशी निगडित समस्यांचे वेळेत निराकरण करा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे, दि. २५ : उद्योगांशी निगडित समस्यांचे संबंधित विभागांनी...

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर

पुणे, दि.25: ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी,...