अजितदादांचा घात डिजिसीएने जाणीवपूर्वक घडवून आणला का?:अमोल मिटकरी आक्रमक

Date:

मुंबई-झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा प्रयत्न असेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. अपघातानंतर एक महिन्याने अहवाल देण्यात आला, तर ब्लॅक बॉक्स तीन आठवड्यांनंतर सापडला. सुमित कपूर संदर्भात डिजिसीएने एक शब्दही उच्चारला नाही, अशी टीका त्यांनी केली. या कारवाईवर आम्ही समाधानी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. व्हीएसआर व्हेंचअर्सला मोठा धक्का बसला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी कंपनीच्या चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अपघातानंतर या विमानांचे विशेष ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये काही गंभीर उणिवा आढळल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही कारवाई उशिरा झाल्याचा आरोप करत मिटकरी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मिटकरी यांनी या प्रकरणात केवळ कंपनीवर कारवाई करून थांबू नये, तर डिजिसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी केली. परवानगीशिवाय विमान उड्डाण करू शकत नाही, मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान उड्डाणासाठी कसे देण्यात आले? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नियुक्त पायलट साहिल मदन आणि सहपायलट यश हे सध्या कुठे आहेत, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कंपनीची विमाने दुरुस्त नव्हती, हे आता मान्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, व्हीएसआर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. सुमित कपूर यांच्याबाबत गंभीर शंका उपस्थित करत त्यांनी या प्रकरणात कंपनी आणि डिजिसीएने स्पष्ट उत्तर द्यावे, असे म्हटले. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेचा संताप वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. गावपातळीवर वातावरण तापत असल्याचा दावा करत, डिजिसीए फक्त भुलथापा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

याचबरोबर, डिजिसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला का, असा थेट आरोपही मिटकरी यांनी केला. बाह्य गुप्तचर यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. अपघातासंदर्भात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे सांगत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. व्हीएसआर आणि डिजिसीए दोघांनीही जनतेसमोर संपूर्ण सत्य मांडले पाहिजे, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर

पुणे, दि.25: ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी,...

रोहित पवारांची DGCA, VSR विरोधात फिर्याद नोंदविताना बडे पोलिस अधिकारी आले, त्यांनी FIR नोंदवणे थांबविले …

रोहित पवारांची पोलिसांशी बाचाबाची , उद्या अजितदादांनी उभारलेल्या बारामती...

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...