रोहित पवारांची DGCA, VSR विरोधात फिर्याद नोंदविताना बडे पोलिस अधिकारी आले, त्यांनी FIR नोंदवणे थांबविले …

Date:

रोहित पवारांची पोलिसांशी बाचाबाची , उद्या अजितदादांनी उभारलेल्या बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार , अन्यथा अजितदादांनी उभारलेल्या न्यायालयात खटला दाखल करणार -रोहित पवार आक्रमक

मुंबई – अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आमदारांचे असे होत असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.रोहित पवार, अमोट मिटकरी यांच्यासह अजित दादां आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, हा एफआयआर पोलिसांनी दाखल करून घेतला नाही.

रोहित पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला आमचा वादविवाद झाला. मात्र, त्यांनी लॅपटॉप आणला. माझं स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात आली. मात्र, एक बडे पोलिस अधिकारी आले. त्यांनी त्यांनी एफआयआर करण्यापासून थांबवलं. त्यांनी आम्हाला का थांबवलं? या पोलिस अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला?, असा प्रश्न असून आमचा संशय बळावत चालला आहे. आम्हाला राज्य सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यानुसार एफआयर दाखल करण्याचा अधिकार आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘आता उद्या सकाळी दहा वाजता बारामतीमध्ये ‘एफआयआर’ दाखल करायचा प्रयत्न करणार आहोत. ती बिल्डिंग दादांनी बांधली आहे. तिथं नाही झालं, तर न्यायालयात जाऊ. ती बिल्डींगही दादांनी बांधलीय.
रोहित पवार म्हणाले की, ‘विखे-पाटील, आशिष शेलार, साताऱ्याचे मंत्री, त्यांचे ट्रोलर ट्रोल करतात. आज पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत. कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय पोलिस अधिकाऱ्यांना अशी मग्रुरी येत नाही. लाखो लोकांच्या आमदारांची अशी अवस्था असेल, तर इतरांचे काय? कोण अडथळे आणत आहेत, कोण नेते आहेत, बघणार,’ असे रोहित पवार म्हणाले. मात्र, मुंबई पोलिसांनी आपण रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून, त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि आमच्याकडे या प्रकरणात घातपात झाल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही पोलिस अद्याप एफआयआर (FIR) दाखल का करत नाहीत? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे. या दुर्घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून घातपाताचा संशय बळावणारे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. वारंवार मागणी करूनही आणि पुरावे देऊनही पोलिस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत जर पोलिस इतकी दिरंगाई करत असतील, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार? व्हीएसआर’ (VSR) या विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे. तपासाची दिशा भरकटवून कंपनीला क्लीन चिट देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस नक्की कोणाच्या दबावाखाली आहेत आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे जनतेला समजले पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....