घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

Date:

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून गरिबांना मिळाली नाही. या योजनेसाठी हक्काचा निधी मिळालेला नाही. या गंभीर मुद्द्यावरून आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. तीन पावसाळे झाले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा,अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या घरांसाठीचा निधी रखडलेला आहे. अनेक लाभार्थ्यांनी घरांची बांधकामे सुरू केली आहेत, परंतु पैसे न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत.लोक आपली घरे सोडून कुठे राहत असतील याचा विचार सरकार करते का? सरकारकडून सतत लवकरात लवकर निधी देऊ ही उत्तर आहेत. हा ‘लवकर’ नक्की कधी येणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत विचारला.

तीन वर्षांपासून निधी रखडल्याने लाभार्थ्यांनी तीन पावसाळे त्यांनी कसे काढले असतील, याची सरकारला जाणीव आहे का?
हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार का? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी घरकुल योजनेबाबत उपस्थित केले.

घरकुल योजनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. केंद्र शासनाकडून या उपक्रमासाठी किती निधी येणे अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार, याचा सविस्तर पाठपुरावा करून हे अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने संपूर्ण माहिती सभागृहासमोर सादर करावी, असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...