राज्यभरात हरवलेल्या ४८ हजार २७८ पैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

Date:

मुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून १३ हजार अल्पवयीन मुली आणि महिलांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी विधानसभेत दिली. राज्यात विशेषत: मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर, छत्र पती संभाजीनगर आदी शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याबाबत मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह विभागाने ही माहिती दिली. राज्यात सन२०२५मध्ये हरवलेल्या ४८ हजार २७८ महिलांपैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तर अजूनही ११ हजार ६९७ महिलांचा शोध लागलेला नाही.

अशाच प्रकारे हरवलेल्या १२ हजार ११३ अल्पवयीन मुलींपैकी १० हजार २९५ महिलांचा शोध लागला असून १८१८ मुली अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे सन २०२४मधील हरवलेल्या ४५ हजार ६६२ महिला आणि अल्पवयीन मुलींच्या विचार करता गेल्या वर्षभरात हरवलेल्या महिला- अल्पवयीन मुलींची संख्या अधिक आहे. मुंबईतून हरवलेल्या ४ हजार ५१५ अल्पवयीन मुले-मुलींपैकी ४ हजार ४५५ मुलांचा मुले-मुलींचा शोध लागला आहे. बेपत्ता व शोषित शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २० जानेवारीपासून ऑपरेशन मुस्कान सुरु करण्यात आले हरविलेल्या मुलांचा शोध घेण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...