यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

Date:

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था, साथी  प्रोग्राम 2026 च्या शुभारंभाची घोषणा करत आहे. हा वर्षभर चालणारा कल्याणकारी उपक्रम असून, चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सातत्यपूर्ण व संरचित सहाय्य देण्याचा उद्देश यामागे आहे. एकदाच दिल्या जाणाऱ्या मदतीपलीकडे जाऊन, मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि जीवनमान उंचावणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

2026 मध्ये हा कार्यक्रम नोंदणीकृत चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य देईल. यामध्ये अन्नसुरक्षा बळकट करण्यासाठी मासिक घरगुती मदत, औषधे व वैद्यकीय तपासण्या यांसह आरोग्यसेवा सहाय्य, मुलांच्या शिक्षण व शालेय गरजांसाठी मदत, तसेच वार्षिक मूळगावी जाण्यासाठी आवश्यक प्रवास सहाय्य यांचा समावेश आहे. 60 वर्षे व त्यापुढील वयाचे निवृत्त चित्रपट कामगार आणि दिव्यांग व्यक्तींवर विशेष भर देण्यात आला आहे, कारण त्यांच्या आरोग्यविषयक गरजा अधिक असून उत्पन्नाची साधने मर्यादित असतात.

साथी प्रोग्राम साठी पात्रतेमध्ये मान्यताप्राप्त संघटनांमध्ये नोंदणीकृत सक्रिय चित्रपट कामगार, कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले असलेली कुटुंबे, तसेच सातत्याने वैद्यकीय उपचारांची गरज असलेले ज्येष्ठ कामगार यांचा समावेश आहे.

साथी प्रोग्राम 2026 अंतर्गत वर्षभराच्या सहाय्याला अधिक बळकटी देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यासाठी वार्षिक सहाय्य रकमेतील वाढ, वैयक्तिक गरजांनुसार मदत देण्यासाठी लवचिक लाभ संरचना, तपासणी व उपचारांसाठी आरोग्यसेवांना अधिक प्राधान्य, तसेच लाभ सहज मिळावेत यासाठी सुलभ डिजिटल वितरण प्रणाली यांचा समावेश आहे.

साथी प्रोग्राम 2026 च्या माध्यमातून यश चोप्रा फाउंडेशन भारतीय सिनेमाच्या पडद्यामागील कणा असलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहे, आणि त्यांना सन्मानपूर्वक व सातत्यपूर्ण सहाय्य देत आहे.

साथी प्रोग्राम 2026 विषयी अधिक माहितीसाठी yashrajfilms.com/ycf या संकेतस्थळाला भेट द्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...