कलाकार कट्ट्याला नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नाव द्या – राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची मागणी

Date:

पुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने गुडलक हॉटेल परिसरातील ऐतिहासिक ‘कलाकार कट्टा’ला नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.यावेळी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील, नगरसेविका प्रिया गदादे तसेच राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष अशोक जाधव उपस्थित होते.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले कि आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, सभागृहनेते तसेच विरोधी पक्षनेते यांना स्वतंत्र निवेदन सादर केले असून, जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य साधून या मागणीवर सकारात्मक आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.गुडलक हॉटेल परिसर आणि आजचा ‘कलाकार कट्टा’ हा केवळ एक बसण्याचा कट्टा नसून मराठी रंगभूमी, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळींचा साक्षीदार आहे. फर्ग्युसन कॉलेज रोड परिसर हा शिक्षण आणि कलेचा केंद्रबिंदू राहिला असून, अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाने हा भाग समृद्ध झाला आहे.समस्त कलाप्रेमी पुणेकरांना माहिती आहे की, याच ठिकाणी डॉ. श्रीराम लागू ‘पीडीए’च्या नाटकांच्या तालमी संपल्यानंतर उशिरापर्यंत तरुण रंगकर्मींसोबत कला, समाज आणि विचारांवर चर्चा करत असत. त्यांच्या सखोल व्यासंगातून आणि जागतिक दृष्टिकोनातून मराठी आधुनिक रंगभूमीला नवी दिशा मिळाली.
त्याच सांस्कृतिक परिघात डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर मोहन आगाशे यांसारखी मान्यवर मंडळी सक्रिय होती. त्यामुळे या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते.
मराठी भाषा, मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणाऱ्या डॉ. लागू यांच्या स्मरणार्थ कलाकार कट्ट्याचे नामकरण करणे, हीच जागतिक मराठी भाषा गौरव दिनाला खरी अभिवादन ठरेल. यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला योग्य तो मान मिळेल.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने केलेली ही मागणी गांभीर्याने विचारात घेऊन तातडीने मान्यता द्यावी, अन्यथा व्यापक लोकचळवळ उभारली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध,...