काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

Date:

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना करण्यात आलेल्या मारहाणीची आपल्याला कोणतीही खंत वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हनुमंत पवार यांनी मला यापूर्वी धमकी दिली होती. काल मी त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले, असे ते म्हणालेत.

तुषार दामगुडे व हनुमंत पवार सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय विश्लेषक म्हणून चर्चा करण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर दामगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हनुमंत पवार यांना मारहाण केली. या घटनेचे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना दामगुडे यांनी आपल्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचे स्पष्ट केले. ते मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मला पूर्वी धमकी दिली होती. एका डिबेट शोमध्ये त्यांनी मला जातिवाचक शिवीगाळही केली होती. त्या घटनेची पुनरावृ्त्ती काल पुन्हा घडली. त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात ते पाहता त्यांना ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज होती. काँग्रेस पक्षाच्या काळात देशात अनेक गंभीर घटना घडल्या होत्या. आपण त्याची नोंद घ्यायला हवी. चर्चासत्रात हनुमंत पवार यांनी मला उद्देशून तू पेशव्यांची पैदास आहेस, तू नाना फडणीस यांची पैदास आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आहे अशा स्वरुपाचे विधान केले होते, असे ते म्हणाले.
मी नक्षलवादी भागात काम करतो. त्यामुळे माझ्याकडे कायदेशीर परवान्यासह बंदूक आहे. ही बंदूक स्वतःच्या सुरक्षेसाठी बाळगणे मला गरजेचे वाटते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, ते या प्रकरणी योग्य तो तपास करतील असा मला विश्वास आहे. मी माझे शस्त्र पोलिसांकडे सोपवले आहे, असेही तुषार दामगुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रीपदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले हे पाहून मला खंत वाटते. त्यांच्याकडून आम्हाला आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. पण पोलिसांनी त्यांना केवळ ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले. ही गंभीर बाब आहे. अशा प्रकरणांत संबंधितांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक असते, असे पवार म्हणाले.

तुषार दामगुडेंना स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल देण्यात आले आहे की, इतरांना दमदाटी करण्यासाठी दिले आहे याचीही या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. आमचा जीव गेल्यानंतर किंवा आमच्या कुटुंबीयांवर संकट ओढावल्यानंतरच पोलिस या प्रकरणी कारवाई करणार का? असा सवालही हनुमंत पवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...