नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटीकडून मोबाईलवर वापरता येणारे ऑनलाईन अजान अॅप्लीकेशन वापरण्याचे आवाहन
पुणे -कोंढवा पोलीस ठाण्याकडून कोंढवा खुर्द येथे मरकजी बैतुल माल फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे पवित्र रमजान महिन्याच्या पाचव्या रोजा निमीत्त दावत ए इफ्तार चा सामाजिक सलोखा वृद्धींगत करणारा कार्यक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळेस पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, डॉ. संदिप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग नम्रता देसाई, तसेच बैतुल माल फाउंडेशनचे अल्ताफ मर्चट, आबीद सय्यद, हाजी तौसीफ शेख, कौसरबाग ट्रस्टचे अध्यक्ष सलीम शेख, मजहर मणियार, कौसरबाग मस्जिद मौलाना कारी अब्दुल्ला, जाहिदभाई शेख अध्यक्ष महाराष्ट्र अॅक्शन कमिटी, वसिमगाई बागवान, बासित शेख, नगरसेवक गफूर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोढवा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी पोलीस आयुक्त यांनी जमलेल्या नागरिकांसमोर केलेल्या भाषणात रमजान महिन्यामध्ये कोंढवा परिसरामध्ये नागरिकांना सायंकाळी उपवास सोडण्याकरीता मस्जिद परिसरात जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचनींना सामोरे जावे लागु नये याकरीता पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त सुरळीत वाहतुक ठेवण्याकडे आमचे अधिक लक्ष राहणार आहे.तसेच रमजान या पवित्र सणाच्य कालावधीमध्ये कोंढवा परिसरामध्ये जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते त्रास देत असतील त्यांची माहिती पोलीसांना दयावी त्यावर पोलीस दलाकडून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुचना दिली आहे. रमजान या पवित्र सणामध्ये पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबध्द असल्याबाबतचे ही त्यांनी सांगितले. तसेच युवकांमध्ये अंमली पदार्थाचे प्रमाण वाढत असून त्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून अंमली पदार्थ शहरातून हद्दपार करण्याकरीता पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे उल्लंघन होवू नये म्हणून नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटी यांचेकडून मोबाईलवर वापरता येणारे ऑनलाईन अजान अॅप्लीकेशन तयार केले. असून त्याचे उदघाटन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते करण्या आलेले आहे. हे अॅप वापरणेसाठी त्यांनी नागरीकांना आवाहन केले .
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप, कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन इस्माईल बागवान यांनी केले.

