किरीट सोमैयांच्या ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा

Date:

काँग्रेसची मागणी ..
सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का दिली नाही..?
पोलीस प्रशासन या बाबत अनभिज्ञ कसे? काँग्रेसचा सवाल
पुणे दि २४ फेब्रुवारी २६ :  माजी खासदार व भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमैया हे मालेगांव (जि. नाशिक ) येथे जाऊन माध्यमांसमोर ‘बांगला देशी अतिरेकीं’ बद्दल संख्येसह नेमकी माहिती देत आहेत व प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे समोर येत आहे, हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक  जिल्हा पोलीस व प्रशासनाने या गंभीर आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा व कारवाई बाबत माहिती जारी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, भाजप नेते त्यांचे बॅाडी गार्ड यांनी वृत्तपत्रे प्रतिनिधीं व पत्रकारांना त्या विषयी प्रश्न विचारण्यास मज्जाव केल्याचे देखील टीव्ही चॅनेल वर पहायला मिळत असून, सोमैयांनी मालेगावमध्ये असलेल्या अतिरेकीकेंद्रा बद्दल जाहीर वक्तव्ये केलीत, त्या शिवाय ४,६०० बांगलादेशी अतिरेकी घुसल्याचा सनसनाटी आरोप देखील केला आहे.
या सर्व प्रकरणाची मालेगांव,  जिल्हा नाशिक प्रशासनाने, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत सत्य वास्तवते बाबत तातडीने खुलासा करावा.. ही सर्व नेमकी माहिती किरीट सोमैयांचेकडे असतांना, ती संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणेकडे का दिली नाही ? असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.

संबंधित माहिती पोलीस प्रशासनास देण्याऐवजी ती स्वतः कडे ठेवल्याबद्दल किरीट सोमैयांना पोलीस प्रशासनाने तातडीने ताब्यात घेऊन, त्यांनी अतिरेकी अड्डा बाबत केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी व वास्तवता जिल्हा प्रशासनाने पुढे आणावी.. अन्यथा साप साप म्हणून भूई थोपटून विशिष्ट धर्मा बद्दल भय, भिती, संशय व द्वेषाचे समाजात कलुषित वातावरण करू पाहणाऱ्या माजी खा. किरीट सोमैयांवर सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली कारवाई करावी..अशी मागणी देखील प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोंढवा पोलीस ठाण्याकडून…दावत ए इफ्तार, पोलीस आयुक्त म्हणाले,’अजानकरीता मोबाईल अॅप वापरा

नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटीकडून मोबाईलवर वापरता येणारे...

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन पुणे, दि.२४...