अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ आधी पूर्ण व्हावे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची मागणी

Date:

पुणे : शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडले असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास निश्चित वयोमर्यादा उलटून अनेक जवान भविष्यातील पदोन्नतीपासून कायमचे वंचित राहण्याची चिंता संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.

अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी हे ४३ ते ५३ वयोगटातील आहेत. भविष्यातील पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामार्फत विविध प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, २०२७ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाची अट ५४ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरेशा संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने सुमारे ९० हून अधिक जवानांचे प्रशिक्षण अद्याप प्रलंबित आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपत आलेली असून ते प्रशिक्षण व पदोन्नतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रशिक्षित मनुष्यबळही अग्निशमन दलास उपलब्ध होऊ शकणार आहे.

‘अग्निशमन दलाचे जवान आग, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण व मालमत्ता वाचविण्याचे काम करतात. केवळ तांत्रिक कारणांमुळे भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होणे अन्यायकारक असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नमूद केले. तसेच, महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भविष्यात नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. उपलब्ध अनुभवी मनुष्यबळाला भविष्यात पदोन्नतीच्या संधींत सामावून घेता यावे, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून, वयोमर्यादा संपत आलेल्या जवानांसाठी नागपूर येथील महाविद्यालयाची आवश्यक मान्यता घेऊन संबंधित प्रशिक्षण पुण्यातच आयोजित करण्यात यावे, तसेच २०२७ पूर्वी सर्व प्रलंबित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याकडे केली.

यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले असल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर
यांनी सांगितले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....