वारजे महामार्ग हायवे चौक ते मुठा नदी पर्यंत (कात्रज कडे) जाणारा १२ मीटर सर्विस डीपी रस्ता, काळाची गरज!

Date:

पुणे नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी आपल्या प्रभाग क्र. ३०, (कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी) येथील वारजे महामार्ग चौक ते मुठा नदी असा १२ मीटर डीपी सर्विस रस्ता विकसित करण्यात यावा, याकरिता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी के ली.

पुणे मनपाचे पथ विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित बाधित जागा पुणे मनपाला हस्तांतरीत व्हावी, याकरिता कार्यरत असणाऱ्या मालमत्ता विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यासह झालेल्या या पाहणीदरम्यान रस्ता बाधित नागरिक वर्गाशी सुसंवाद साधण्यात आला. वाढती लोकसंख्या आणि सम प्रमाणात वाढते शहरीकरण यासाठी रस्त्याचे महत्व नागरिकांना पटवून देताना प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी ओढयावरील पुलाचे काम काळाची गरज असून सदर कामाचा शुभारंभ करण्याबद्दल प्रशासनाला विनंती करण्यात आली. याबाबत मनपाचा आराखडा तयार करण्यात आला असून आज तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. वाढत्या लोकसंख्या आणि नागरीकरण या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जबाबदारी याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली असून प्रशासनानेही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच सदर कामाचा श्रीगणेशा होईल, असा विश्वास वाटतो. असेही दुधाने यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...