भाजपच्या विरोधात बोलतोस म्हणून पिस्तुल दाखवून धमकावले,मारले,पण अटक नाही: ६ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हा दाखल

Date:

पुणे- काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी मित्रमंडळ चौकातील पदपथावर घडली.या प्रकरणी हनुमंत दिगंबर पवार (वय 41, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तुषार दामगुडे यांच्यासह बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषीकेश परदेशी आणि अभिमन्यू मैड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामगुडे आणि पवार हे सोमवारी सायंकाळी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र संपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते मित्रमंडळ चौकातील पदपथावर थांबले होते.त्यावेळी दामगुडे आणि पवार यांच्यात बाचाबाची झाली. दामगुडे यांनी पवार यांना तू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतोस. तुला हर्षवर्धन सपकाळ यांचा एवढा पुळका का आहे? पुण्यात राहायचे असेल, तर नीट राहा, अशी धमकी दिली. त्यानंतर दामगुडे यांनी पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या साथीदारांसह पवार यांना मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार कैद झाला आहे. या घटनेनंतर पवार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन दामगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ पुढील तपास करत आहेत.

याप्रकरणात काँग्रेस शिष्टमंडळाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मंगळवारी भेट घेतली. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...