काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांकडून मारहाण

Date:

पोलीस आयुक्त साहेब अटक करणार कधी ?

पुणे-पुण्यात सोमवारी संध्याकाळी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, मारहाणीदरम्यान दामगुडे यांनी आपल्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्यात सोमवारी ‘पुढारी न्यूज’च्या ‘धुरळा’ या चर्चासत्रात ‘शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता गपगुमान’ या विषयावर झालेल्या चर्चेनंतर, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात कार्यालयाबाहेर जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले असून, तुषार दामगुडे आणि त्यांच्या 3-4 साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये दामगुडे यांनीच सुरुवातीला हात उगारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कार्यक्रम संपल्यावर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. यादरम्यान गेटबाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मला शिवीगाळ करुन बोलावले आणि तू भाजप- संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो, असा जाब विचारत तुषार दामगुडेंनी मला पिस्तुल दाखवले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना केलेल्या शिवीगाळीचा हनुमंत पवार यांनी तीव्र विरोध केला होता. याच जुन्या वादाचा राग धरून दामगुडे यांनी सोमवारी पवार यांना ‘तू हर्षवर्धन सपकाळांची बाजू घेणारा कोण?’ असा जाब विचारत त्यांच्यावर हा हल्ला केला. पवार यांच्या दाव्यानुसार, मागील चर्चेतील ती शाब्दिक चकमकच या मारहाणीमागचे प्रमुख कारण ठरली असून, वैचारिक विरोधाचे रूपांतर अशा प्रकारे शारीरिक हिंसाचारात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला तुरुंगात टाकावे- हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजप गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....