कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

Date:

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर (89) यांचे रविवारी रात्री पुणे येथे दुःखद निधन झाले. कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर या त्यांची कन्या गौरी देशपांडे महाबळेश्वरकर यांच्याकडे पुणे येथे अलीकडेच राहायला गेल्या होत्या. माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत्या.

त्यांच्या पार्थिवावर सातारा येथे आज सकाळी कैलास स्मशानभूमी, संगम माहुली येथे गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही धार्मिक विधी करण्यात आलेले नसून मरणोत्तर त्यांनी नेत्रदान केले होते. त्यांचे पार्थिव उचलताना व माहुली येथे ‘कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वर को लाल सलाम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यांच्या पश्चात दोन नातू जावई एक विवाहित मुलगी गौरी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शंकर माळवदे व इतर अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे यांनी त्रिपुरा इथून शोक संदेश पाठवला व कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांच्याबरोबरच्या व त्यांच्या चळवळीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटना यांना गेल्या महिन्यातच त्यांनी प्रत्येकी एक एक लाख रुपये देणगी दिली होती. सातारा नगर परिषदेच्या राजकारणात या एकमेव विरोधी पक्षनेत्या त्या कालावधीत होत्या आणि आपल्या म्हणण्याशी व तत्वांशी त्या नेहमीच आग्रही राहिल्या. जनवादी महिला संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी त्या नेहमीच सक्रिय राहिल्या होत्या. अगदी अलीकडेच त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, मरियम बूटवाला ढवळे, अशोक ढवळे हे भेटून गेले होते व प्रकृतीची चौकशी केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...