बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Date:

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला बौद्ध धम्म हा मनःशांती तून विश्वशांती चा आदर्श जीवनमार्ग आहे.बौद्ध धम्म विश्वशांतीचे प्रतीक आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

बुद्धगया येथील बौद्धांचे जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान असणाऱ्या महाबोधी महाविहार येथील पवित्र
बोधीवृक्षाखाली जागतिक बौद्ध भिक्खू संमेलन भदंत हर्षबोधी यांनी आयोजित केले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी भारतातील अनेक बौद्ध भिक्खू तसेच नेपाळ; श्रीलंका; जपान; तैवान; व्हिएतनाम; कंबोडिया; लाओस; मलेशिया; सिंगापूर ; तिबेट; थायलँड आदी जगभरातील अनेक देशांतून बौद्ध भंते या बौद्ध संमेलनास उपस्थित होते.

महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली.बौद्ध धम्म मानवतेचा विज्ञानवादी समतेचा न्यायाचा धम्म असल्यानेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारतात धम्मचक्र पुन्हा एकदा प्रवर्तित केले.असे ना. रामदास आठवले म्हणाले.

महाबोधी वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.त्यामुळे बोधिवृक्ष हा वैश्विक स्तरावर ज्ञानाचे प्रतीक आहे.महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार चे सर्व व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.महाबोधी महाविहार विश्वस्त ट्रस्ट चे चेअरमन आणि सर्व सदस्य बौद्ध असावेत. त्याबाबत बिहार सरकारने त्वरीत निर्णय घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी लाखो बौद्धांची आणि आपली मागणी आहे. या मागणीसाठी आपण यापूर्वीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांची आपण भेट घेतली होती.आता उद्या पटना येथे बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पुन्हा आपण भेट घेणार असल्याचे ना .रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.
बौद्ध संमेलनपूर्वी ना. रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार येथे भगवान बुद्धांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे शिरसावंद्य दर्शन न. रामदास आठवले यांनी घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....