‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

Date:

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी..

पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर झोपलेल्या चार वर्षांच्या मुलीचे कुरकुरे घेऊन देण्याच्या बहाण्याने अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (ता.१७) या प्रकरणी मध्य प्रदेशमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी लाेहमार्ग पाेलीसांनी आरोपी विराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पुणे रेल्वे स्टेशन येथे फलाट क्रमांक तीनवर मध्य प्रदेश मधील खंडवा येथे जाण्यासाठी एक मजुर कुटुंबीय जेवण करून फलाटवरच झाेपले हाेते. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चार वर्षाच्या मुलीला एका व्यक्तीने कुरकुरे घेऊन देण्याच्या बहाण्याने फुस लावून तिच्या संमती शिवाय पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

रात्री दीड वाजता मुलीचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना मुलगी दिसून आली नाही. त्यामुळे त्यानी सर्वांना जागे करत त्यांनी मुलीचा सर्वत्र शाेध घेतला; ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पुणे लाेहमार्ग पाेलीसांना दिली. पाेलिसांनी रेल्वे फ्लाटवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर, एक व्यक्ती चार वर्षीय मुलीस हाताला धरून तिला घेऊन जात असताना दिसला.आरोपी हा रेल्वे गाडीतील सामान उतरताना मदत करत हाेता. त्याला व मुलीला पाेलिसांनी रेल्वे परिसरात शाेध घेऊन सहा तासांनी पार्सल गेटजवळून शाेधून ताब्यात घेतले. पाेलिसांनी मुलीकडे विचारणा केल्यावर तिने ‘काका मला कुरकुरे घेऊन देताे असे म्हणून घेऊन गेला ‘अशी माहिती दिली. मुलीच्या कपड्यावर रक्ताचे डाग देखील दिसून आले व तिने तिच्या पाेटात दुखत असल्याचे सांगितल्याने पाेलिसांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला...

‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर,32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी 7 जण जेरबंद

मुंबई-क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर...

पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार ,त्यांचे सर्व प्रश्न सोडविणार -महापौर

पुणे-महापालिका हद्दीतील प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित...

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...