18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा समारोप एआय इम्पॅक्टवरील नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारून झाला, जो कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या जाहीरनाम्याला 88 देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिली आहे, जी आर्थिक वाढ आणि सामाजिक हितासाठी एआयचा वापर करण्याबाबतची व्यापक जागतिक सहमतीची निदर्शक आहे.
एआयसाठी सामायिक जागतिक दृष्टीकोन
“सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” (सर्वांसाठी कल्याण, सर्वांसाठी आनंद) या तत्त्वानुसार, जाहीरनाम्यात असे अधोरेखित केले आहे की एआयचे फायदे संपूर्ण मानवजातीमध्ये समान रीतीने वाटले पाहिजेत.
ते यावर भर देते:
- आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहु-भागधारकांच्या सहभागाला बळकटी देणे
- राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर करणे
- सुलभ आणि विश्वासार्ह चौकटींद्वारे एआयला पुढे नेणे
कृतीचे सात स्तंभ (चक्र)
- एआय संसाधनांचे लोकशाहीकरण
- आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याण
- सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय
- विज्ञानासाठी एआय
- सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रवेश
- मानवी भांडवल विकास
- लवचिक, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण एआय प्रणाली
- प्रमुख जागतिक कामगिरीची घोषणा
या शिखर परिषदेने स्वयंसेवी, सहयोगी जागतिक उपक्रमांची मालिका सादर केली, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:
1. एआयच्या लोकशाही प्रसारासाठी सनद
- मूलभूत एआय संसाधनांमध्ये परवडणाऱ्या प्रवेशास प्रोत्साहन देते
- स्थानिकदृष्ट्या संबंधित नवोन्मेष परिसंस्थांना समर्थन देते
2. ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्स
- जागतिक स्तरावर एआय वापराच्या केसेसचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी एक व्यासपीठ
- विकासाच्या परिणामासाठी देशांतर्गत सहकार्य सक्षम करते
3. ट्रस्टेड एआय कॉमन्स
- साधने, बेंचमार्क आणि सर्वोत्तम पद्धतींचे भांडार
- सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय प्रणालींच्या विकासास समर्थन देते
4. विज्ञान संस्थांसाठी एआयचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क
- जागतिक वैज्ञानिक सहकार्य सुलभ करते
- एआय-चालित संशोधन क्षमता वाढवते
5. सामाजिक सक्षमीकरणासाठी एआय प्लॅटफॉर्म
- ज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रमाणशीर उपाय सक्षम करते
- न्याय्य एआय अवलंबण्यावर लक्ष केंद्रित करते
6. एआय वर्कफोर्स डेव्हलपमेंट प्लेबुक आणि रीस्किलिंग प्रिन्सिपल्स
- एआय कौशल्य, पुनर्कौशल्य आणि साक्षरतेला समर्थन देते
- एआय-चालित अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रांना तयार करते
7. लवचिक आणि कार्यक्षम एआय बद्दल मार्गदर्शक तत्त्वे
- ऊर्जा-कार्यक्षम एआय प्रणालींवर लक्ष केंद्रित करते
- एआय इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्सवरील प्लेबुकद्वारे समर्थित
- आर्थिक वाढ आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते
जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे:
- आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यात एआयची भूमिका
- मुक्त-स्रोत आणि सुलभ एआय परिसंस्थांचे महत्त्व
- ऊर्जा-कार्यक्षम एआय पायाभूत सुविधांची आवश्यकता
- विज्ञान, प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणात एआयची भूमिका वाढवणे
- जागतिक सहकार्य मजबूत करणे
सहभागी सदस्यांनी खालील वचनबद्धतांचा पुनरुच्चार केला
- एआय प्रशासनातील सामायिक जागतिक प्राधान्यक्रमांचा विकास
- स्वयंस्फूर्त, चाकोरीबद्ध नसलेल्या आराखड्यांना प्रोत्साहन
- सततच्या सहकार्यातून कल्पना प्रत्यक्षात आणणे
या शिखर परिषदेद्वारे दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय भागीदारीला चालना मिळेल आणि एआयला आर्थिक विकासाचा प्रमुख घटक बनेल अशी अपेक्षा आहे.
88 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी मंजूर केलेला शिखर परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे
परिशिष्ट
एआय इम्पॅक्ट शिखर परिषद जाहीरनामा
नवी दिल्ली, 18-19 फेब्रुवारी 2026
प्रस्तावना
सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय (सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी) या प्रेरणादायीतत्त्वाला अनुसरुन आमचा असा विश्वास आहे की, एआयचे फायदे जेव्हा मानवतेसाठी होतील तेव्हाच त्याचा खरा उपयोग होईल.
आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांचे व देशांचे सहभागी नवी दिल्लीत 19 फेब्रुवारी 2026 रोजी एआय इम्पॅक्ट शिकर परिषदेसाठी एकत्र आलो आहोत. एआयचे आगमन हा तंत्रज्ञान क्रांतीच्या आलेखावरील सर्वोच्च बिंदू आहे. आज आम्ही निवडलेले पर्याय एआय सक्षम विश्वाला आकार देतील. हा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी वारसा ठरेल.
आमच्या देशांमधील भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सर्व संबंधितांचा सहभाग एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या सात चक्रांभोवती केंद्रित ठेवण्याचा हा निर्धार आहे. मानवी भांडवलाचा विकास, सामाजिक सक्षमीकरणाच्या कक्षा रुंदावणे, एआय प्रणालींची विश्वासार्हता, एआय प्रणालींची उर्जा कार्यक्षमता, एआयचा विज्ञानात उपयोग, एआय संसाधनांचे लोकशाहीकरण आणि आर्थिक विकास व समाजकल्याणासाठी एआयचा उपयोग ही ती सात तत्त्वे आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय व अन्य उपक्रमांना पूरक म्हणून आम्ही राष्ट्रीय सार्वभौमतेचा मान राखत शिखर परिषदेतील सात चक्रांच्या आधारे एआयचा मानवतेच्या सेवेसाठी कसा वापर करता येईल याची माहिती एकमेकांसोबत सामायिक करू.
एआय संसाधनांचे लोकशाहीकरण
एआयच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी गतिमान डिजिटल पायाभूत सुविधा आणि अर्थपूर्ण तसेच वाजवी दरातील इंटरनेट सुविधा ही प्राथमिक गरज आहे. वसुधैव कुटुम्बकम (हे विश्व एक कुटुंब आहे) या भावनेतून एआय संसाधनांचे रास्त दर आणि उपलब्धता यांच्या महत्त्वाची आम्हाला जाणीव आहे. सर्व देशांना नागरिकांच्या फायद्यासाठी एआयचा विकास, स्वीकार व अंमलबजावणी यासाठी सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे.
या परिणामासाठी एआयच्या लोकशाहीकरणाच्या प्रसाराची सनद म्हणून आम्ही स्वयंस्फूर्त व चाकोरीबद्ध नसलेल्या आराखड्याची नोंद घेतली आहे. राष्ट्रीय कायद्यांचा आदर राखत मूलभूत एआय संसाधनांच्या उपलब्धतेला चालना, स्थानिक संदर्भातील नवोन्मेषाला पाठिंबा आणि लवचिक एआय परिसंस्था बळकटीकरण ही या सनदेची वैशिष्ट्ये आहेत.
आर्थिक वाढ आणि सामाजिक हित
एआय आणि एआय-आधारित अॅप्लिकेशन्सचा वाढता आवलंब यामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्याची अभूतपूर्व क्षमता आहे. ओपन-सोर्स एआय अॅप्लिकेशन्स आणि जिथे योग्य असेल तिथे इतर उपलब्ध होण्यायोग्य एआय दृष्टिकोन आणि एआय वापर प्रकरणांचा व्यापक प्रसार, क्षेत्रांत सर्वत्र एआय प्रणालींची स्केलेबिलिटी, पुनरावृत्तीक्षमता आणि अनुकूलनामध्ये योगदान देऊ शकतो.
आम्ही ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्सची नोंद घेतो, हा स्वयंसेवी उपक्रम असून तो सर्व भागांमध्ये यशस्वी एआय वापर प्रकरणांचा अवलंब, अनुकरण आणि स्केलिंगला प्रोत्साहन आणि अवलंब शक्य करण्यासाठी व्यावहारिक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय
विश्वास निर्माण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक फायदे मिळण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि भक्कम एआयला प्रोत्साहन देणे ही मूलभूत बाब आहे. संभाव्य सुरक्षा पैलूंबद्दल आपली समज वाढवणे महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन आम्ही एआयच्या संपूर्ण जीवनचक्रात सार्वजनिक हिताला प्रोत्साहन देण्यासोबतच नवोन्मेषास वाव मिळण्यासाठी एआय प्रणालींमध्ये सुरक्षिततेचे महत्त्व, उद्योगांच्या-नेतृत्वाखाली स्वेच्छेने केलेल्या उपाययोजना आणि तांत्रिक उपायांचा अवलंब आणि योग्य धोरणात्मक चौकटींना मान्यता देत आहोत.
आम्ही तांत्रिक संसाधने, साधने, बेंचमार्क आणि सर्वोत्तम पद्धती एकत्रित करणाऱ्या, ज्याचा कोणालाही वापर करता येऊ शकेल आणि त्यांचे संदर्भ आत्मसात करता येऊ शकतील अशा स्वयंसेवी आणि बंधनकारक नसलेल्या विश्वासार्ह एआय कॉमन्स या सहयोगी व्यासपीठ विकासाला; तसेच त्याच्या स्वयंसेवी मार्गदर्शक नोटला मान्यता देतो.
विज्ञान
सर्व देशांमध्ये एआय संशोधन पायाभूत सुविधांमधील संरचनात्मक अडथळे दूर करून आणि त्यांची उपलब्धता वाढवून वैज्ञानिक संशोधन आणि विकासात एआयचा वापर वाढवण्यास मदत होऊ शकेल हे आम्ही मान्य करतो. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्यांमुळे अद्वितीय कौशल्य, दृष्टीकोन आणि संसाधने एकत्र आणून संशोधन आणि विकासात एआयची क्षमता खुली करता येऊ शकेल.
एआयच्या परिणामकारक अवलंबास गती देण्यासाठी, वैज्ञानिक समुदायांना जोडण्यासाठी आणि सर्व प्रदेशांतील सहभागी संस्थांमधील एआय संशोधन क्षमतांचा संचय करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून विज्ञान संस्थांसाठी एआयच्या स्वयंसेवी आणि सहकार्यात्मक आंतरराष्ट्रीय नेटवर्कची आम्ही दखल घेतो.
सामाजिक सक्षमीकरणासाठी वापरासयोग्य
व्यक्तींना ज्ञान, परदेशी एआय सोल्यूशन्स, माहिती, सेवा आणि संधी उपलब्ध करून देऊन तसेच सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांमध्ये सहभाग वाढवून समाजाच्या सर्व घटकांची उन्नती करण्याची एआयमध्ये क्षमता आहे. सामाजिक सक्षमीकरणासाठी एआयचा अवलंब सुलभ करणाऱ्या सहकार्याचे महत्त्व आम्ही मान्य करतो.
सामाजिक सक्षमीकरणाकरिता एआयचा अवलंबात आणखी पुढे जाण्याच्यादृष्टीने शिक्षण, ज्ञान आणि स्केलेबल पद्धतींचे आदानप्रदान करणे शक्य होऊ शकेल यासाठी स्वयंसेवी आणि सहकार्यात्मक व्यासपीठ विकसित होण्याची गरज आम्ही लक्षात घेत आहोत.
मानवी संपदा
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेची पूर्तता करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील मानव संसाधन विकासाचा विस्तार, शिक्षण क्षेत्रातील विशिष्ट उपक्रम, एआय कार्यबल विकास, सार्वजनिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, एआय क्षमतांबद्दल जनजागृती वाढवणे, एआय साक्षरता वाढवणे तसेच व्यावसायिक आणि प्रशिक्षण परिसंस्थाचे उन्नतीकरण करून व्यक्तींना संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे.
एआय संदर्भात कौशल्य विकास आणि पुन:कौशल्य विकास उपक्रमांमध्ये अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देताना एआयच्या युगातील पुनर्कौशल्य विकासासाठी स्वैच्छिक मार्गदर्शक तत्त्वे आणि एआय कार्यबल विकासावरील प्लेबुकची नोंद घेतली जात आहे. हे उपक्रम सहभागींना एआय आधारित भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी तयारी करण्यात मदत करतील.
लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता
ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधनांवर एआयच्या वाढत्या मागण्यांची दखल घेत, आम्ही ऊर्जा कार्यक्षम एआय प्रणाली विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. परवडणाऱ्या एआय प्रणालीमुळे एआयमध्ये व्यापक प्रवेश मिळू शकतो आणि स्थानिक नवोन्मेषाला गती मिळून सामायिक विकासात्मक उद्दिष्टांची पूर्ती करता येते येईल.
लवचिक, नवोन्मेषी आणि कार्यक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेवरील स्वयंसेवी मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला लवचिक आणि कार्यक्षम एआय प्रणालींच्या विकासासाठी मार्गदर्शन करतील, यांची आम्ही दखल घेतो. तसेच, लवचिक ए आय पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्लेबुकची ज्ञानसंपदा म्हणून नोंद घेतो, जे लवचिक एआय विकासाला पाठबळ देणारे संदर्भ साधन आहे.
निष्कर्ष
एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहु-भागधारक दृष्टिकोन मजबूत करण्यास योगदान देईल, जेणेकरून सामायिक प्राधान्ये तसेच स्वैच्छिक आणि बंधनकारक नसलेल्या मार्गदर्शक सूचना आणि तत्त्वे पुढे नेली जातील, ज्या मानवतेकरिता समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एआयला प्रोत्साहन देऊ शकतील, याची आम्ही दखल घेतो.
एआयचे लाभ साकार करण्यासाठी आमच्या सामायिक आकांक्षा पुढे नेण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत आणि इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या तीन सूत्रांसाठी या आकांक्षांचे ठोस कृतींमध्ये रूपांतर करण्याकरिता सतत सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो.

