पुणे : प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विक्रांत आढाव (वय ५२) यांचे आज (ता. २१) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहिण असा परिवार आहे.
त्यांच्यावर उद्या (ता. २२) दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.एवढ्या कमी वयात झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. विक्रांत आढाव हे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे भूतपूर्व कार्यकारणी सदस्य होते. त्यांनी स्पोर्ट्स आणि पॉलिटिकल रिपोर्टिंग केली. दै. केसरी, दै पुढारी, दै. संध्या येथे काम केले होते.
विक्रांत आढाव हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू तसेच वेटलिफ्टिंग चे खेळाडू होते. त्यांनी पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते.ते स्वतः नामांकित जलतरण प्रशिक्षक होते. त्यांनी अनेक उत्तम जलतरणपटू तयार केले
स प महाविद्यालय क्रीडा विभाग तसेच महाविद्यालय जलतरण तलाव चे आजीव सदस्य म्हणून ते कार्यरत होते.सलाम पुणे आणि mymarathi.net च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..
पत्रकार विक्रांत आढाव यांचे निधन
Date:

