भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

Date:

दादर येथे भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजी

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी २०२६
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून प्रचंड घोषणाबाजी करत भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणा-यांचा भाजप कार्यालयासमोर फुले उधळून निषेध केला.

आज सायंकाळच्या सुमारास मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस आंदोलन करणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची दडपशाही मोडून काढत झीनत शबरीनं यांच्या नेतत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयसमोर पोहोचून तीव्र घोषणाबाजी केली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजपच्या कार्यालयासमोर फुले उधळून अनोख्या पद्धतीने निषेध केला. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलीस स्थानकात नेले.

यावेळी बोलताना झीनत शबरीनं म्हणाल्या की, आंदोलनादरम्यान आम्ही भाजपा कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून “द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही,” असा स्पष्ट संदेश दिला. लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र हिंसेच्या धमक्या देणे हे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे. युवक काँग्रेस लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत राहील.”
पोलीस भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करायला मोकळी सूट देतात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करतात. आंदोलन करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात, घरातून पोलीस घेऊन जातात. पण राहुल गांधी विरोधात भाजप जेव्हा आंदोलन करते तेव्हा पोलीस गायब असतात. पोलिसांनी युवक काँग्रेसवर दडपशाही करण्यापेक्षा राहुल गांधींना गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमक्या देणा-यांवर कारवाई केली पाहिजे असे शबरीनं म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषि क्षेत्राशी सांगड घालावीराज्यपाल आचार्य देवव्रत यांचे...

गुलटेकडीत अल्पवयीन मुलांनी रेग्युलर खंडणीसाठी केला हवेत गोळीबार, म्हणाले, आम्हीच इथले भाई …

पुणे: गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार...

आमदारांकडून विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अभ्यास दौरा मार्गदर्शक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी; सहभागी सदस्यांना...

पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसचे आंदोलन

अनेक पदाधिकारी डिटेन पुणे, दि. २१ फेब्रुवारी : AI Summit दरम्यान...