आमदारांकडून विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अभ्यास दौरा मार्गदर्शक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी;

सहभागी सदस्यांना सर्टिफिकेटचे वितरण

मुंबई दि.२१: राष्ट्रकुल संसद परिषद (CPA) आणि वेल्स विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण झाला. या दौऱ्यात सहभागी सदस्यांना त्यांचे प्रमाणपत्र नॅशनल लिबरल क्लब येथे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला CPA चे उपसचिव जनरल जार्विस मटिया, जोनाथन ग्रे, अध्यक्ष, राष्ट्रकुल नेतृत्व संस्था .आयन बॅसेट,जागतिक नातेसंबंध , युडब्लुएसटीडी , ईडब्ल्यूएसटीडी चे प्रो. जेरेमी स्मिथ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन चैतन्य मारपकवार यांनी केले होते.

विधानपरिषद सभापती राम शिंदे व ऊपसभापती नीलम गोर्हे यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. यासमारंभात मंत्री आदिती तटकरे, आमदार बाबासाहेब देशमुख, विश्वजीत कदम, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम पाचपुते, विक्रांत पाटील, सुमित वानखेडे, मनीषा कायंदे, निरंजन डावखरे, वरुण सरदेसाई, परिणय फुके, विक्रम काळे आदी विधिमंडळ सदस्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभारंभ विचार (ओपनिंग रिमार्क ) केले. त्या म्हणाल्या, “विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज करताना जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला जातो. त्यामागे सदस्यांची पार्श्वभूमी असते. परंतु जागतिक दृष्टिकोन वाढवणे आणि विविध प्रश्नांसाठी व्यासपीठ मिळणे यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात सर्व सदस्यांचा शंभर टक्के सहभाग होता.
वेल्स अभ्यास दौर्‍यामुळे विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यास निश्चितच मदत होईल.”

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “येणाऱ्या काळात राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या च्या वतीने असे उपक्रम राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जावेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभले. तसेच सांस्कृतिक मंत्री आणि राष्ट्रकुल संसदिय मंडळ खजिनदार ना. आशिष शेलार यांचेही विशेष सहकार्य मिळाले.”

सहभागी आमदारांनी या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवांचा अहवाल तयार करून विधिमंडळ कार्यालयात सादर करावा, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले. यामुळे भविष्यातील अशा दौर्‍यांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल.

हा दौरा शाश्वत विकासासाठी नेतृत्व, जागतिक नागरिकत्व आणि संसदीय कार्यपद्धती यासंदर्भात ज्ञानवृद्धी करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. सदस्यांनी वेल्श संसद यांसह विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि अनुभव घेतले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

दादर येथे भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन मुंबई युवक...

गुलटेकडीत अल्पवयीन मुलांनी रेग्युलर खंडणीसाठी केला हवेत गोळीबार, म्हणाले, आम्हीच इथले भाई …

पुणे: गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार...

पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसचे आंदोलन

अनेक पदाधिकारी डिटेन पुणे, दि. २१ फेब्रुवारी : AI Summit दरम्यान...

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...