राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

Date:

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाच्या २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देणारे भाषण सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या राज आमेरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होते.यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न उपस्थित केल्याने भाजप अस्वस्थ झाली आहे. संसदेत निशिकांत दुबे यांनी वापरलेली भाषा पूर्णपणे चुकीची असून, ती कायद्याचे उल्लंघन आणि संविधानविरोधी भाजपची भूमिका दर्शवते, असे शिंदे यांनी म्हटले.

शिंदे यांनी आरोप केला की, याच पार्श्वभूमीवर लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांचा हस्तक राज आमेरा राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देऊ शकतो. ते म्हणाले, ‘महात्मा गांधींना मारणारी विचारधारा हीच होती. नथुराम गोडसे तेव्हाही होता आणि आजही आहे, पण राहुल गांधी कोणालाही घाबरत नाहीत.’

देशहितासाठी आणि लोकहितासाठी राहुल गांधी सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या बाजूने उभे आहेत, त्यामुळेच भाजप आणि त्यांची विचारधारा द्वेष पसरवत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचे संरक्षण करण्यास सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले. या पसरवल्या जाणाऱ्या द्वेषातून राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागल्यास हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही, याची भाजपने नोंद घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, खजिनदार ॲड. अभय छाजेड आणि पुणे शहर उपाध्यक्ष प्राची दुधाने यांनीही निषेधपर भाषणे केली. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, वीरेंद्र किराड, सुनील मलके, मेहबूब नदाफ, अमीर शेख, सुनील शिंदे, राज अंबिके, नगरसेवक साहिल केदारी, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, द. स. पोळेकर, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सीमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्हाळ, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, कांचन बालनायक आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या...