लोहगाव–वाघोली रस्त्यावरील कंपनीला भीषण आग;

Date:

पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

पुणे : लोहगाव–वाघोली रस्त्यावरील त्रिमूर्ती लॉन्स परिसरातील एका कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीचे स्वरूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाने दाखवलेली तत्परता आणि सात बंबांच्या मदतीने केलेल्या प्रभावी कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
लोहगाव–वाघोली रस्त्यावरील ‘मेडार्थ लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर ऑइल, ग्रीस आणि अन्य ज्वलनशील साहित्य साठवलेले होते, ज्यामुळे आगीने रौद्ररूप धारण करून शेजारील फर्निचर मॉललाही विळखा घातला. मॉलमधील फर्निचर आणि दोन भरलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत आग पोहोचल्याने परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. आगीची माहिती मिळताच, पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन केंद्राचे दोन बंब काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचे पाच बंबही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. ऑइल आणि ग्रीसमुळे आग वेगाने पसरत असताना जवानांनी जीवाची बाजी लावत पाण्याचा मारा केला, तसेच ऑइलची आग विझवण्यासाठी ‘फोम’चा वापर केला. गॅस सिलिंडरपर्यंत आग पोहोचलेली असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत शिताफीने परिस्थिती हाताळत संभाव्य मोठा स्फोट टाळला.

सुदैवाने, आग लागताच कंपनीतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून, त्यानंतर कुलिंगचे (थंड करण्याचे) काम सुरू करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आगीची माहिती मिळताच आमचे पथक तातडीने रवाना झाले. ऑइल आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग वेगाने पसरत होती; मात्र वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे शेजारील वस्ती वाचवता आली आणि मोठी हानी टळली.”

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शेतकरी,बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार: रमेश चेन्नीथला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित...

कात्रजजवळ अपघाताचा थरार!:5 वाहनांना उडवून डंपर जळून खाक, भीषण अपघातात 4-5 प्रवासी गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावरील जांभुळवाडी बोगद्याजवळ डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने...