खडकी स्टेशन ते औंध रोड पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करा – सुनील माने

Date:

औंध (प्रतिनिधि) : खडकी स्टेशन, औंध रोड या रस्त्यावर वाहतुकीच्या समस्या असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता होण्यासाठी खडकी स्टेशन ते ब्रेमेन चौक  हा रस्ता चांगल्या प्रतीचा तयार करण्यासाठी हा रस्ता संपूर्ण सिमेंटचा करणे गरजेचे आहे, तसेच पादचाऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करावे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.  या मागणीचे पत्र त्यांनी आज महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता रमेश वाघमारे यांना दिले. याबाबत त्यांनी या रस्त्यांच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ब्रेमन चौक ते औंध रोड आंबेडकर चौक या रस्त्यावर वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत मी पुणे यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांना  दिले होते. यानंतर २५ नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांना पत्र दिले होते.  माझ्या या पत्रानुसार २८ नोव्हेंबर रोजी वाहतूक पोलिस व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसह ब्रेमेन चौक ते खडकी स्टेशन या रस्त्याची आम्ही संयुक्त पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान ब्रेमन चौक ते खडकी स्टेशन परिसरात जागोजागी रस्ता खराब असल्याचे तसेच काही ठिकाणी रस्त्याचे फक्त डांबरीकरण असल्याचे लक्षात आले. या संयुक्त पाहणीत हा रस्ता प्राधान्यक्रमाने सिमेंट काँक्रीटचा करणे गरजेचे आहे, तसेच लोकांच्या सुविधेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करावेत यावर एकमत झाले होते. त्या संदर्भात आधी झालेल्या चर्चेनुसार कृपया या रस्त्यासाठी लवकरात लवकर आर्थिक तरतूद करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. या मागणीवर सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता रमेश वाघमारे यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रजित नायर आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पदाचा पदभार स्वीकारला.

पुणे- आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा...

ड्रेनेज विभागातील हजारो कोटींच्या खर्चाची चौकशी करा:महापौरांकडे नैमित्तिक समिती स्थापनेची भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो...